बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

पुणे | गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना पाहायला मिळत आहे. नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत देखिल वाढ होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाला कोरोना रूग्णसंख्या कमी करण्यासाठी यश येताना दिसत असतानाच पुण्यातील कोरोनाग्रस्तांची आजची आकडेवारी ही धक्कादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 4 हजार 119 रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 5 हजार 13 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 87 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं आहे. यातील 25 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1391 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,19,518 इतकी आहे. तर पुण्यात 43 हजार 244 सक्रिय रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 6 हजार 797 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,69,477 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 19 हजार 537 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर बाहेर फिरत असल्याने दैनंदिन लागणाऱ्या गोष्टींची दुकानं ही सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत फक्त 4 तास सुरू ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यासोबतच या बैठकीत इतर मुद्द्यांवरही चर्चा झाली.

थोडक्यात बातम्या-  

“रोहित सरदाना खोटारडा होता, तो कुणाच्याही लक्षात राहणार नाही”

#सकारात्मक_बातमी | श्रीगोंद्यातील दोघा आजोबांची कोरोनावर यशस्वी मात

“भारतासोबत अनेक विकसनशील देशांना लसनिर्मितीचा फॉर्म्यूला देऊ नये”, बिल गेट्स यांचं धक्कदायक वक्तव्य

इंदोरीकर महाराजांनी सांगितला कोरोनातून वाचण्याचा ‘हा’ खास उपाय

दिलदार गब्बर! मिशन ऑक्सिजनसाठी केलेली मदत ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More