बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आज पुण्यात कोरोनाचे किती रुग्ण आढळले?; सर्व आकडेवारी एका क्लिकवर…

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 6 हजार 443 रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4 हजार 712 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 73 जणांना प्राणांना मुकावं लागलं आहे.

पुण्यात सध्या 1250 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3,67,237 इतकी आहे. तर पुण्यात 56 हजार 336 सक्रिय रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 6 हजार 109 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 3,04,492 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 24 हजार 72 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. राज्य सरकारच्या निर्देशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद असणार आहेत. तसेच राज्य सरकारच्या आदेशाचेही अंमलबजावणी शहरात काटेकोरपणे केली जात आहे.

थोडक्यात बातम्या-  

देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये- एकनाथ खडसे

दिवसभरात फक्त 2 लवंग खा… होतील विश्वास बसणार नाहीत इतके फायदे

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई होणार?

“जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”

कोरोनापासून वाचण्यासाठी काय खावं, काय खाऊ नये?, अत्यंत महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More