बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा”

मुंबई | निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घोतल्यानंतर त्यांनी गांधी कुटुबीयांची भेट घेतली. त्यामुळे वर्तुळात चर्चा अनेक चर्चांना उधाण आलं आहे. यातच शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभं केलं जाणार असल्याचंही बोललं जात आहे. यावर राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी टीका करायला सुरूवात केली आहे. अशातच भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवारांनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा सोडलेली दिसतं आहे, असं म्हणत अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांना चांगलीच कोपर खळी मारली आहे. भातखळकर यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. शरद पवारांना राष्ट्रपती करण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत, यावर त्यांना विचारण्यात आलं होतं.

जर निवडणुकीचा विचार केला तर लोकसभा, राज्यसभेत भाजपचं बहुमत आहे, त्यामुळे भाजपचा जो कोणी उमेदवार असेल तोच निवडून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शरद पवार यांना फक्त यातून प्रसिद्धीची ऊर्जा मिळते, याशिवाय काही साध्य होणार नाही, असं म्हणत भातखळकरांनी पवारांवर टीका केली आहे.

अतुल भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट देखील केलं आहे. त्यामध्ये त्यांनी ‘किती दिवस भावी पंतप्रधान राहू’ किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा, असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षाची हालचाल बघून मला ‘बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी’, अशी मराठी म्हण मला आठवत असल्याचं भातखळ यांनी म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“बैलगाडीवरून कोसळलात तसे सायकलवरून घरंगळत जाऊ नका म्हणजे झालं”

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा

‘…अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू’; खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन!

‘खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?’; न्यायालयाने उर्जामंत्र्यांकडे मागितलं उत्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More