बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानमध्ये ‘इतके’ भारतीय नागरिक पडलेत अडकून?; समोर आली आकडेवारी!

नवी दिल्ली | अफगाणिस्तानमध्ये तालिबानने हल्ला केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. अफगाणिस्तानचे नागरिक घरातील सामान न घेता देश सोडून जात आहे. त्यामुळे काबुल विमानतळावर लोकांची प्रचंड गर्दी दिसुन आली. तसेच अफगाणिस्तानमध्ये भारतातील नागरिकही अडकले आहेत. अशातच भारतात किती नागरिक आहेत याबाबतची माहिती समोर आली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये काबूल विमानतळावर लोकांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली. वाढत्या गर्दीमुळे तिथे चेंगराचेंगरी होण्याची शक्यता होती. त्यावेळी काही अमेरिकन सैनिकांंनी गर्दीला पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केला. तर काही लोक विमानावर चढताना दिसले तर काही जण विमानाच्या चाकावर बसताना व्हायरल व्हिडीओंमध्ये दिसत आहे.

एनडीटीव्हीने दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी आणि त्यांच्या सुरक्षासाठी असलेले निमलष्करी दलांसह एकुण 200 पेक्षा भारतीय अफगाणिस्तानमध्ये अडकलेले आहेत. अशातच त्यांना भारतात माघारी आणण्यासाठी काबूल विमानतळावर एक भारतीय विमान उभं आहे. मात्र तालिबान्यांनी तेथील शहरात कर्फ्यू लावला असल्याने भारतीयांना परत कसं आणायचं हा प्रश्न पडला आहे.

दरम्यान, भारतातील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस मधील 100 सैनिक ही अफगाणिस्तानमध्ये अडकल्याची माहिती समजत आहे. याबाबत कॅबिनेट सचिव परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत नागरिकांना बाहेर काढण्यासंदर्भात चर्चा करत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून समजत आहे. तर अफगाणिस्तानमध्ये उद्धवलेल्या परिस्थितीमुळे काबूलमधील विमानसेवा ही बंद करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोदी नसते तर आज भारताची अवस्था अफगाणिस्तानसारखी झाली असती- कंगणा राणावत

मुंबई कोरोनामुक्त होतंय! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लीकवर

‘शहाण्यांना शब्दाचा मार’; 12 आमदारांच्या नियुक्तीपत्रावरून शरद पवारांचा राज्यपालांना टोला

कडक ना भावा! ना रोहित, ना विराटला जे जमलं ते शमीने करून दाखवलं

अफगाणिस्तानच्या तरूण मुलींवर मोठं संकट, ‘या’साठी सुरू आहे जबरदस्ती!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More