बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी पुन्हा येईनसाठी किती रडीचा डाव खेळणार? – रोहिणी खडसे

मुंबई | ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला आहे. भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातल्यानं 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं आहे. यानंतर आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेत्यांनी विधीमंडळाच्या आवारात अभिरूप विधानसभा थाटत वेगळं कामकाज केलं.

यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. मी पुन्हा येईनसाठी किती रडीचा डाव खेळणार? सभागृहात न जाता बाहेर शो बाजी करुन काय मिळविणार? असा खोचक सवाल रोहिणी खडसे यांनी केला आहे.

दरम्यान, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज समारोप झाला. दोन दिवसीय अधिवेशनात मोठ्या घडामोडी घडल्या. सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. समारोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

आम्ही ओबीसींना न्याय देण्यासाठी केंद्र सरकारडे माहिती देण्याची मागणी केली. यात काय गुन्हा केला? भाजप सत्तेत असताना त्यांनीही ही माहिती मागितली होती. मग जर त्या माहितीत 8 लाख चुका होत्या तर तुम्ही ती कशासाठी मागितली होती?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“बाळासाहेबांनंतर कोण नेता असेल तर तो राजसाहेब ठाकरे आहे”; व्हिडीओ व्हायरल

दादा कोंडकेंच्या घराची झाली दयनीय अवस्था; प्रथमेश परबनं फोटो शेअर करत वेधलं सगळ्यांच लक्ष

काँग्रेसला धक्का! काँग्रसचे माजी मंत्री राहिलेले ‘हे’ नेते होणार भाजपवासी

“30 वर्ष युती होती तेव्हा काही झालं नाही आणि आता एकत्र आल्यावर काय होणार आहे?”

“अफजल खानाप्रमाणे तुम्ही दालनात गळाभेट घेतल्या नंतर पाठीत खंजीर खुपसला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More