देशभरातील HMPV च्या रुग्णांचा आकडा समोर!

HMPV Virus

HMPV Virus l जगभरात 2020 मध्ये थैमान घातलेल्या कोरोना महामारीनंतर आता पुन्हा एका नव्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे. ह्युमन मेटाप्युमो व्हायरस (HMPV) या चीनमधील नव्या व्हायरसने जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. देशात सोमवारी बंगळुरू आणि गुजरातमध्ये या व्हायरसची लागण झालेले काही रुग्ण आढळले. यानंतर महाराष्ट्रात देखील याचा शिरकाव होत असल्याचं दिसून येतं आहे. अशातच आता देशभरातील रुग्णांची संख्या वाढली आहे.

HMPV च्या रुग्णांमध्ये वाढ :

HMPV च्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच अहमदाबादमध्ये 1, बेंगळुरूमध्ये 2, चेन्नईत 2, कोलकाता 1 तर महाराष्ट्रात 3 इतके रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, या व्हायरसला सामोरे जाण्यासाठी केंद्र सरकार पूर्णपणे तयार असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्रात नागपूर येथे HMPV चे दोन संशयित रूग्ण आढळले. त्यात आता मुंबईतही एका लहान मुलाला याची लागण झाल्याची माहिती आहे. मात्र चीनमधील HMPV विषाणूसंदर्भात नाहक भीती न बाळगता आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

HMPV Virus l HMPV व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही :

दरम्यान, एचएमपीव्ही (HMPV) व्हायरस हा धोकादायक व्हायरस नाही. तसेच हा व्हायरस भारतात आधीपासूनच अस्तित्वात होता. त्यामुळे प्रत्येक भारतीयांमध्ये या व्हायरसच्या विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज आहेत. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. या व्हायरसमुळे मृत्यूचा धोकाही नसल्याचं सीएसआयआरचे माजी डायरेक्टर जनरल डॉक्टर शेखर मांडे यांनी म्हटलंय.

या व्हायरसची कोरोना सारखीच लक्षणे आहेत. मात्र, घाबरून जायचे कारण नाही. या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका नाही. या व्हायरस विरोधात लढण्यासाठी भारतीयांमध्ये अँटिबाडीज आहेत, त्यामुळे घाबरून जाऊ नका. कोरोना सारखा हा नवीन व्हायरस नाहीये. भारतात देखील हा व्हायरस नवीन नाही. जुनाच व्हायरस असल्याने त्याचा जास्त धोका नाही, असंही डॉक्टर शेखर मांडे म्हणाले आहेत.

News Title : How many patients of HMPV in the country?

महत्वाच्या बातम्या –

नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किंमती जाहीर!

HMPV ने चिंता वाढवली, राज्यात ‘या’ ठिकाणी 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह

मोठी बातमी! अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी तुरुंगातून बाहेर येणार

पुण्याला मिळणार 4 वंदे भारत एक्सप्रेस; ‘या’ मार्गांवर धावणार

बीड पुन्हा हादरलं! ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .