Top News विधानसभा निवडणूक 2019

मनसे विधानसभेला ‘इतक्या’ जागा लढवणार?

Loading...

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये ‘लाव रे तो’ व्हीडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंच्या मनामध्ये विधानसभा निवडणूक लढवावी की लढू नये, असा संभ्रम सुरू असताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर राज ठाकरे निवडणुकीत काही उमेदवार रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणूक लढू नये, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे होते. मात्र, काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर राज ठाकरे यांचे मत बदलल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतरच राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती समजली आहे.

Loading...

मनसे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास मनसे ५० ते ६० जागांवर निवडणूक लढणार असल्याचेही समजतय. यामध्ये मुंबई, ठाणे, नाशिक, पंढरपूर, वणी तसेच काही ग्रामीण भागामध्ये जिथे मनसेची ताकद आहे, अशा ठिकाणी मनसे आपले उमेदवार देऊ शकते.

माहीम मतदारसंघामध्ये मनसेकडून संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार आणि नितीन सरदेसाई हे तीन जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.

Loading...

महत्वाच्या बातम्या –

Loading...

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या