नवी दिल्ली | लोकसभा अध्यक्ष आणि भाजप खासदार ओम बिर्ला सध्या चर्चेत आहेत. राजकारणाने नाहीत तर त्यांच्या धाकल्या मुलीने मिळवलेल्या घवघवीत यशामुळे ते चर्चेत आहेत.
ओम बिर्ला यांना दोन मुली आहेत. यामधील मोठी आकांक्षा बिर्ला ही सीए आहे तर दुसरी मुलगी अंजलीने युपीएसी परीक्षेत आयएएसपदाला गवसणी घातली आहे. वडिल इतक्या मोठ्या पदावर असतानासुद्धा मुलींनी शिक्षण घेतलं आहे.
दोन्ही मुली उच्चशिक्षित आहेत मग ओम बिर्ला यांचं शिक्षण किती झालं आहे?, ओम बिर्ला यांनी महर्षी दयानंद कॉलेजमधून बी. कॉम आणि एम. कॉम पुर्ण केलं आहे. त्यानंतर त्यांनी राजकीय कारकीर्द विद्यार्थी नेतेपादाची निवडणुक लढवली होती.
दरम्यान, बिर्ला यांची धाकटी कन्या अंजलीने पहिल्याच प्रयत्नात आयएएसपद मिळवलं आहे.
थोडक्यात बातम्या-
तानाजी चित्रपटाला एक वर्ष पु्र्ण! शौर्य गाथेचा भाग बनणं खूप अभिमानास्पद- शरद केळकर
लसीच्या सुरक्षेबाबत शंका, पंतप्रधानांनी आधी स्वत:ला लस टोचून घ्यावी- राष्ट्रवादी
‘आज मला पाकिस्तानला हरवल्यासारखं वाटलं’; भारतीय संघातील ‘या’ शिलेदाराची प्रतिक्रिया
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला- देवेंद्र फडणवीस
‘योगी की मौत सुनिश्चित हैं’; आपच्या आमदाराचं वक्तव्य, पाहा व्हिडीओ