प्रेम असावं तर असं; असा बनवणार हार्दिक अक्षयाचा व्हेलेंटाईन डे खास

मुंबई | ‘तुझ्यात जीव रंगला'(Tujhyat Jeev Rangala) या मालिकेतून घराघरात पोहचलेल्या अंजली-राणाच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. अजूनही प्रेक्षक मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री विसरू शकले नाहीत.

सर्वांचे लाडके अंजली-राणा म्हणजेच अक्षया देवधर(Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशीने(Hardik Joshi) काही महिन्यांपूर्वी खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधली. या दोघांना रिअल लाईफमध्ये एकत्र पाहून त्यांचे चाहते प्रचंड खुश आहेत.

हार्दिक-अक्षयाची लवस्टोरीही याच मालिकेच्या सेटवर सुरू झाली. म्हणूनच आज व्हेलेंटाईन डेच्या(Veletine Day) निमित्तानं राणा आपल्या अंजलीसाठी काय काय करणार आहे, हे जाणून घेऊयात.

व्हेलेंटाईनच्या डेच्या काही दिवस आधी बोलताना हार्दीक म्हणाला होता की, व्हेलेंटाईन डेच्या दिवशी शूटच्या आधी मी अक्षयाला कोल्हापूरच्या देवीच्या मंदिरात घेऊन जाईन. तसेच अक्षयला साडी खूप आवडत असल्यानं तिला साडीच्या दुकानात नेईल आणि तिला जी साडी आवडेल ती घेऊन देईन.

अक्षयला साधेपणा खूप आवडतो. शूट संपल्यावर तिला कोल्हापूरमधील तिच्या आवडत्या ठिकाणी जेवायला घेऊन जाईन. बायको म्हणून अक्षयाला थोडं स्पेशल ट्रीट करेन, असंही हार्दिक म्हणाला.

फक्त व्हेलेंटाईन डे आहे म्हणूनच असं वागलं पाहीजे, असं काही नाही. याउलट जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळतो तेव्हा आपण आपल्या प्रियजनांसाठी काहीतरी स्पेशल करू शकतो, असंही हार्दिक म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More