बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

RBI च्या गव्हर्नरला महिन्याला मिळतात ‘इतके’ लाख, मानधन वाचून थक्क व्हाल

नवी दिल्ली | आरबीआयचे गव्हर्नर(RBI Governor) हे बँकर्सचे बँकर आहेत. ते सरकारचेही बँकर असतात. आरबीआयच्या गव्हर्नरची देशाच्या चलनी नोटांवर स्वाक्षरी असते. ते देशाच्या चलन आणि पत व्यवस्थेवर नियंत्रण ठेवतात. त्यांच्या कामाचा परिणाम अर्थ व्यवस्था, शेअर बाजार, आणि सामान्य लोकांच्या जीवनावरही होतो. सध्याचे आरबीआयचे गव्हर्नर ‘शक्तिकांत दास’ (Shaktikanta Das) यांची 11 डिसेंबर 2018 रोजी RBI चे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

शक्तिकांत दास(Shaktikant Das) यांना दर महिन्याला 2 लाख 5 हजार सॅलरी मिळते. सॅलरीसोबतच इतर फायदेही आरबीआयचे गव्हर्नरला मिळत असतात. महागाई भत्ते आणि इतर पेमेंटही मिळत असतात. तसेच आरबीआयचे गव्हर्नर सोबतच आरबीआयचे चार उपगवर्नर आहेत. गव्हर्नर आणि उपगव्हर्नर यांच्या पगारात 31,500 रूपयांचा फरक असतो.31,500 रूपये उपगवर्नरला गव्हर्नरपेक्षा कमी मिळतात.

RBI  हे देशातील जीडीपी(GDP) अंदाज देखील सांगतात. गव्हर्नर हे चलनविषयी धोरण तयार करणे, अंमलबजावणी आणि देखरेख करण्यास मदत करतात.चलन आणि नाणी जारी करणे किंवा देवाणघेवाण करणे यावरही तो देखरेख करतो. अर्थव्यवस्थेवर(Economy) जनतेचा विश्वास टिकवून ठेवणे. ठेवीदाराच्या हिताचे रक्षण करणे आणि लोकांना परवडणारी बँकिंग सेवा प्रदान करणे हे त्यांचे उद्दीष्ट असते.

बँक नोट जारी करण्याचा एकमेव अधिकार फक्त त्यांना आहे. सरकारी धोरणाव्यतिरिक्त ते नवीन बँका, खासगी बँका आणि परदेशी बँकांसाठी परवाना देखील जारी करतात. गरिबी संपवण्यासाठी सरकार प्रायोजित योजनांवरही ते देखरेख ठेवतात.

थोडक्यात बातम्या-

मान आणि डोक्याच्या कॅन्सरची ‘ही’ आहेत गंभीर लक्षणं, चुकूनही करू नका दुर्लक्ष

राज्यात पुन्हा सत्तापालट होणार?, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ

‘तू मला या जगातच का आणलंस?’; अभ्यासाला बस म्हणताच चिमुकला आईवर भडकला

अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांचा दणका!

“बाळासाहेब ठाकरेंच्या पोटी जन्माला आलात म्हणून काय तुम्ही राजा झालात का?”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More