“हेलिकाॅप्टरने फिरण्याइतका पैसा प्रकाश आंबेडकरांना मिळतो कुठून?”

अकोला | वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेलिकाॅप्टरमधून फिरतात. त्यासाठी त्यांच्याकडे एवढा पैसा येतो कोठून, असा सवाल करत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे.

महाआघाडीचे उमेदवार हिदायत पटेल यांच्या प्रचारासाठी अकोल्यात प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं.

प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी ही विरोधकांचे मतविभाजन करण्यासाठी स्थापन केलेली आहे, असं वक्तव्यही चव्हाण यांनी केलं आहे.

आंबेडकर लाखो रुपये खर्च करुन सभा घेतात. त्यांना कोण रसद पुरवत आहे, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

-हा काँग्रेस आमदार करणार शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार; काँग्रेसला धक्का

-राणेंसोबत शिवसेना सोडली हा आमचा मुर्खपणा; माजी आमदाराची खंत

-“राष्ट्रवादीचे 10 पेक्षा जास्त खासदार निवडून आल्यास शरद पवार पंतप्रधान होतील”

-देशाची राज्यघटना बदलणं चिक्की खाण्याएवढं सोपं नाही; धनंजय मुंडेंचा पंकजांवर निशाणा

-पाण्यावरुन राजकारण करणाऱ्यांनो पुणेकर तुम्हाला नक्कीच पाण्यात बुडवणार- गिरीश बापट