बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नियम धाब्यावर बसवुन साताऱ्यात कशी हजारोंच्या संख्येने पार पडली यात्रा, पाहा व्हिडीओ

सातारा | महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना राज्य सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. लग्न समारंभ, राजकीय सोहळे तसेच धार्मिक कार्यक्रमांवरही पूर्णतः बंदी असल्याचं राज्य सरकारने घोषित केलं. पण सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मात्र सरकारने घालून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून हजारोंच्या संख्येने लोक धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचं पाहायला मिळालं.

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात बावधनची बगाड यात्रा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. कोरोना काळात अनेक मोठमोठ्या यात्रा आणि समारंभ रद्द करण्यात आले. एवढंच काय तर पंढरपूरची वारी देखील रद्द झाली. पण साताऱ्यातील ग्रामस्थांनी हजारोंच्या संख्येने बगाड यात्रा पार पाडली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसून येतंय की, पहाटेच्या वेळेला हजारो ग्रामस्थांनी एकत्र येऊन यात्रेला सुरुवात केली आणि सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडवला. संबंधित बगाड यात्रेला सातारा जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील लोकांनी उपस्थिती लावली तसेच प्रशासनानं कोरोनाबाबत कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचं यावेळी पाहायला मिळालं.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बगाड यात्रा ज्या बावधन गावामध्ये पार पडली ते गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे आणि तिथे कलम 144 लागू करण्यात आलेलं असतानाही एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांनी जमुन कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून धार्मिक कार्यक्रम पार पाडला. तसेच यात्रा संपल्यानंतर गावकऱ्यांनी मोठमोठ्या राजकीय सभांना झालेली गर्दी चालते मग आमच्या धार्मिक कार्यक्रमांवर बंदी का असा प्रश्न उपस्थित केला.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या

कोरोना निगेटिव्ह असतांना दिला कोरोना पाॅझिटिव्हचा रिपोर्ट, अन् जिवंतपणीच केलं मृत घोषित

भाजप आमदाराच्या गाडीत ईव्हीएम मशीन सापडल्याने खळबळ

महाराष्ट्रातील ‘हा’ साखर कारखाना रोहित पवारांच्या कंपनीला भाडेतत्त्वावर देण्याचा ठराव मंजूर

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; पुढील सात दिवस ‘या’ सेवा राहणार बंद

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबई लोकलबाबत घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More