Silver Cleaning Tips l सध्या चांदीचे दर झपाट्याने वाढत आहेत. अशा वेळी घरात जुनी, काळी पडलेली चांदी वाया घालवणं म्हणजे मोठं नुकसानच! पण काळजी करू नका, कारण चांदीच्या दागिन्यांना नव्यासारखा चमकदार लुक घरच्या घरीच देता येतो आणि तेही फक्त १० मिनिटांत.
सराफा तज्ज्ञांचा खास घरगुती उपाय :
एका सराफा व्यावसायिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, काळी पडलेली साखळी, जोडवी, पैंजण किंवा इतर चांदीची दागिने घरीच सहज स्वच्छ करता येतात. यासाठी तुम्हाला लागेल:
१ चमचा मीठ
१ चमचा सोडा
२ चमचे कपडे धुण्याचा पावडर
२५० मि.ली. पाणी
Silver Cleaning Tips l उपाय कसा करावा? :
– एका पातेल्यात २५० मि.ली. पाणी गरम करा.
– त्यात वरील तीनही घटक मिसळा.
– त्यात तुमचे चांदीचे दागिने टाका.
– ४-५ मिनिटे उकळा.
-त्यानंतर जुना टूथब्रश वापरून घासून घ्या.
चांदी काळी का पडते? :
तज्ज्ञ सांगतात, हवेतील सल्फरचे संयुग चांदीच्या संपर्कात आल्यानंतर चांदीवर काळसर थर तयार होतो. हे केवळ अस्सल चांदीचीच लक्षणं असतात. त्यामुळे काळसरपणा म्हणजेच दागिने नकली आहेत, असं समजण्याची गरज नाही.
आजच्या वाढत्या चांदीच्या दरामुळे जुनी चांदी टिकवणं ही शहाणपणाची गोष्ट ठरते. दागिने पुन्हा वापरण्यायोग्य झाले तर तुम्ही नव्याची गरजही टाळू शकता आणि खर्चही वाचवू शकता.