बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC कशी करायची? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Sanman Nidhi Yojana) शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये जमा केले जातात. या योजनेतील यावर्षीच्या तिसऱ्या हप्त्याची तारीख देखील जाहीर झाली आहे. मात्र, आता 2022 पासून या योजनेत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तो म्हणजे आता प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC करणं बंधनकारक असणार आहे.

e-KYC करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला pmkisan.gov.in या वेबसाईटवर जावं लागणर आहे. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला Farmers Corners असा एक पर्याय दिसेल. त्याखाली e-KYC असा एक पर्याय दिलेला आहे. e-KYC या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Aadhar ekyc असं पेज ओपन होईल. त्यावर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे.

वरील सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला Search या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर येईल. त्यापुढे तुम्हाला तुमचा आधार कार्डसोबत लिंक असलेला फोन नंबर टाकायचा आहे. यानंतर पुढे Get Otp या पर्यायावर क्लिक करायचं आहे. शेवटी Submit For Auth या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला EKYC Suceessfully Submitted असा मेसेज येईल. याचा अर्थ तुमचं KYC पूर्ण झालं आहे.

दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत e-KYC केलेली नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना यावर्षीचा तिसरा हप्ता मिळणार का? अशा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. तर यावर्षी सर्व शेतकऱ्यांना तिसरा हप्ता मिळणार आहे. मात्र, 2022 पासून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी e-KYC करून घेणं, अनिवार्य असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

सचिनने ‘तो’ प्रश्न विचारला अन् माझी झोपच उडाली; रणवीर सिंगने सांगितला किस्सा

रावते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो”; अजित पवारांनी मागे वळून पाहिलं अन्…

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पक्ष सोडण्याच्या तयारीत, एका ट्विटनं उडाली खळबळ

कोरोनाचा पुन्हा हाहाकार! ‘या’ देशात कडक लाॅकडाऊन लागू

प्रियांका-निकचा घटस्फोट?; अखेर प्रियांकाने सोडलं मौन, म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More