Top News अहमदनगर महाराष्ट्र

वाहतूक नियमांचं पालन कसं करावं?; शाळकरी मुलांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल

अहमदनगर | कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज सुरु करण्यात आले आहेत. अशातच रस्त्यावरुन शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओमध्ये शाळेतील विद्यार्थी सायकलवरुन एका-पाठोपाठ, रांगेत शाळेत जाताना दिसत आहेत. या मुलांनी बेशिस्तीने वाहन चालवणाऱ्यांना एक प्रकारे धडा घालून दिला आहे.

एका नागरिकाने कारमधून हा व्हिडीओ शूट केल्याचं दिसतंय. ‘वाळूज’ला जात असताना हा व्हिडीओ शूट केल्याचं कारमधील माणूस सांगत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर या मुलांच्या शिस्तीचं नेटकऱ्यांकडून कौतुक केलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून हा व्हिडीओ लोकांकडून शेअर देखील केला जात आहे.


थोडक्यात बातम्या-

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राहिले फक्त एवढे दिवस!

200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धरपकड सुरु; पुण्यातील या कारवाईनं गुंडांचे धाबे दणाणले!

नवीन कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्याच फायद्याचे- नरेंद्र मोदी

आयसीएआयचा ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दणका, वाचा सविस्तर!

उपमुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या