बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तुम्हाला तुमच्या गावाला जायचंय का? मग ‘ही’ माहिती नक्की वाचा…

कोरोनामुळे राज्याच्या विविध भागात अडकलेल्या आणि आपल्या गावी तसेच आपल्या राज्यात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे, मात्र यासाठी काही अटी देखील घालून देण्यात आलेल्या आहेत. ज्या नागरिकांकडून या अटींची पूर्तता होईल त्यांनाच आपल्या गावी जाण्याची परवानगी मिळणार आहे.

नेमक्या काय आहेत या अटी आणि शर्ती?

-मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश आणि या भागात महापालिका आयुक्तांनी कन्टेनमेंट झोनच्या सीमा निश्चित केल्याशिवाय तेथे बाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी यासंदर्भात आदेश काढला आहे.

-राज्य सरकारने स्थलांतराबाबतची एक कार्यपध्दती निश्चित केली आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना यामध्ये नोडल अधिकारी म्हणून नेमण्यात आलं आहे. मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षातून या सर्व कारभारावर देखरेख ठेवली जाणार आहे.

-प्रत्येक जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांची यादी तयार करण्यात येणार आहे. त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पाठविण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची असणार आहे. जिल्हाधिकारी किंवा आपत्ती व्यवस्थापन संचालकांच्या पत्राशिवाय कोणालाही कुठल्याही परिस्थितीत आपल्या गावी जाता येणार नाही.

-मुंबई महानगर प्रदेश, पुणे महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश या भागांतून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देताना विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. मुंबई-पुण्याप्रमाणेच राज्यातील कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या मालेगाव, सोलापूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, औरंगाबाद आणि नागपूर या जिल्ह्यांतूनही बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याची नागरिकांना परवानगी देताना विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.

-सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाची लक्षणे असलेल्या नागरिकांना बाहेरच्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी मिळणार नाही, तसेच आपल्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी हवी असलेल्या नागरिकांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे.

-नोडल अधिकारी हे नागरिकांना बाहेर जाण्याची परवानगी देताना ज्या जिल्ह्यात ते नागरिक जाणार आहेत, तेथील नोडल अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देतील. तसेच ज्यांना आपल्या गावी जायचे आहे त्यांची सर्व माहिती ही स्थानिक पोलिस ठाण्याला दिली जाईल.

-कुटुंबातील एक व्यक्ती गावी जाणाऱ्यांचे आधार कार्ड, दूरध्वनी क्रमांक, पत्ता आणि जाण्याचे ठिकाण आदी माहिती पोलिसांना देईल, सोबतच कोणत्या वाहनाने प्रवास करणार या माहितीसह अर्ज पोलिसांकडे दाखल करावा लागेल.

-जे प्रवास करणार आहेत आणि त्यांना करोनाची लक्षणे नाहीत, यासाठी डॉक्टरांकडून प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्यानंतरच त्यांना प्रवासासाठी परवानगी मिळेल. खाली प्रेसनोट देण्यात आलेली आहे, त्यामध्ये असलेल्या मेल आयडीवर रितसर मेल करुन आपल्याला प्रवासाची परवानगी घ्यावी लागेल.

ट्रेंडिंग बातम्या-

किम जोंग उनच्या तब्येतीबद्दल नवी माहिती समोर!

पुण्यात नव्याने 93 कोरोनाबाधितांची नोंद; पूर्व भागात रूग्ण का वाढतायेत?

महत्वाच्या बातम्या-

रजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या? असं कसं चालेल- राज ठाकरे

मंत्रिमंडळात समन्वय नाही, एकत्र बसून निर्णय घेतले जात नाहीत- राज ठाकरे

“यापुढे हिंदुस्थान-पाकिस्तान अन् धर्म-जातीवादाची प्यादी बंद करून आर्थिक प्रश्नावर काम केलं पाहिजे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More