बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलात?, गावी जायचंय, दुसऱ्या राज्यात जायचंय?… वाचा काय आहे प्रक्रिया?

मुंबई |  जीवघेण्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातली लॉकडाऊनची मुदत 3 मेला संपणार होती. मात्र ती पुन्हा 17 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजे आता तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनला 4 मे पासून सुरूवात होणार आहे. 4 मे ते 17 मे पर्यंत तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत तसंच राज्यातल्या अनेक भागात लोक अडकून पडले आहेत. आता मुंबईत अडकून पडलेल्या लोकांसाठी सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे.

पर्यटक, तिर्थयात्री, विद्यार्थी आणि कामगार यांना आता आपापल्या राज्यात किंंवा त्यांच्या मूळगावी जाता येणार आहे. मुंबईत 90 पेक्षा जास्त पोलिस स्टेशन आहेत. त्यातल्या कोणत्याही एका पोलिस स्टेशनला जाऊन तुम्हाला तिथे एक अर्ज भरून द्यावा लागणार आहे. त्या अर्जात तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि पत्ता भरून द्यावा लागणार आहे.

तसंच तुम्ही कोणत्या वाहनाने प्रवास करणार आहात? किती आसन क्षमता असलेलं ते वाहन आहे? आणि किती लोक त्या वाहनातून सद्य परिस्थितीत प्रवास करणार आहात? याचे डिटेल्स देखील देणं गरजेचं आहे.

प्रवास करणाऱ्यांसाठी नियम व अटी –

  1. नोंदणीकृत डॉक्टरांकडून प्री मेडिकल स्क्रीनिंग केलेलं नसेल तर तुम्हाला प्रवास करता येणार नाही.
  2. वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक प्रवाश्यांना प्रवास करता येणार नाही.
  3. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करणं बंधनकारक असेल.
  4. वाहनाच्या निर्जंतुकीकरणाशिवाय प्रवासाला परवानगी दिली जाणार नाही.
  5. एका व्यक्तीला एका व्यक्तीसाठीच अर्ज करता येणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

किम जोंग उनच्या तब्येतीबद्दल नवी माहिती समोर!

पुण्यात नव्याने 93 कोरोनाबाधितांची नोंद; पूर्व भागात रूग्ण का वाढतायेत?

महत्वाच्या बातम्या-

तुम्हाला तुमच्या गावाला जायचंय का? मग ‘ही’ माहिती नक्की वाचा…

रजमान सणासाठी रस्ते भरणार आणि बाकीचे रस्त्यावर आलं की काठ्या? असं कसं चालेल- राज ठाकरे

मंत्रिमंडळात समन्वय नाही, एकत्र बसून निर्णय घेतले जात नाहीत- राज ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More