Money Plant | मनी प्लांट घरात लावणे हा अनेकांचा आवडता छंद आहे. काही लोक घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी मनी प्लांट लावतात, तर काही लोक वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shastra) घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी लावतात. मनी प्लांटला संपत्ती आकर्षित करणारे रोप मानले जाते. असे मानले जाते की, मनी प्लांट घरात सकारात्मक ऊर्जा (Positive Energy) आणते. (Money Plant)
मनी प्लांटची वाढ खुंटली आहे?
मनी प्लांट लावताना काही महत्त्वाच्या गोष्टींचा विचार केल्यास त्याची वाढ चांगली होते. मात्र, काही लोकांच्या घरी मनी प्लांटची वाढ खुंटते किंवा पाने पिवळी पडू लागतात. अशावेळी, काही सोप्या उपायांनी तुम्ही मनी प्लांटच्या वाढीला चालना देऊ शकता.
मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी टिप्स:
योग्य माती (Soil): मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी सुपीक माती वापरणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही मनी प्लांट कुंडीत लावत असाल, तर मोठ्या कुंडीत एक तृतीयांश वर्मी कंपोस्ट (Vermi Compost), एक तृतीयांश सुपीक माती आणि एक तृतीयांश नदीची वाळू (River Sand) घेऊन चांगले मिसळा. कुंडीत तळाशी छिद्र असणे आवश्यक आहे, ज्यामुळे पाण्याचा निचरा होईल.
सूर्यप्रकाश (Sunlight): प्रत्येक वनस्पतीसाठी सूर्यप्रकाश आवश्यक असतो, परंतु मनी प्लांटला थोड्या प्रमाणात सूर्यप्रकाशाची गरज असते. थोडा प्रकाश मिळाल्यास त्याची वाढ चांगली होईल. मात्र, थेट सूर्यप्रकाशामुळे पाने पिवळी पडू शकतात आणि वाढ खुंटू शकते.
आधार (Support): मनी प्लांट वेलीसारखे वाढणारे रोप आहे. त्यामुळे त्याला आधाराची आवश्यकता असते. अनेक लोक मनी प्लांट भिंतीवर चढवतात, पण त्यामुळे भिंत खराब होऊ शकते. म्हणून, कुंडीत बांबूची काठी (Bamboo Stick) लावा आणि त्यावर मनी प्लांट चढवा. (Money Plant)
पोषण (Nutrition): मनी प्लांटची चांगली वाढ होण्यासाठी त्याला आवश्यक पोषण देणे गरजेचे आहे. जर तुमच्या मनी प्लांटची पाने पिवळी पडत असतील किंवा वाढ थांबली असेल, तर खालील उपाय करा.
पाने पिवळी झाल्यास ‘हे’ उपाय करा-
5 ते 6 लिटर पाण्यात एक चमचा युरिया (Urea) आणि एक चमचा ह्युमिक ऍसिड (Humic Acid) चांगले मिसळा.
हे मिश्रण एका बाटलीत भरून पानांवर फवारा किंवा मुळांवर हळूहळू टाका. यामुळे मनी प्लांटची वाढ झपाट्याने होईल.
या साध्या उपायांमुळे तुम्ही मनी प्लांटची उत्तम काळजी घेऊ शकता आणि त्याची वाढ अधिक चांगली करू शकता. यामुळे तुमच्या घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येईल, असे मानले जाते. (Money Plant)
Title : How to Grow Money Plant Faster Simple Tips and Tricks