बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विकत आणलेल्या पदार्थांमधील भेसळ कशी ओळखायची? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | दिवाळीची लगबग सध्या सुरू झाली असून गृहींणींनी दिवाळीसाठीचे पदार्थ आणि मिठाई बनवायला सुरूवात सुद्धा केली आहे. मात्र दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांची विक्री होते. त्यामुळे अनेकवेळा गृहीणींच्या मनात आपण विकत आणलेल्या पदार्थ शुद्ध आणि खाण्याजोगे तर आहेत ना? अशी भीती निर्माण होते. मात्र तुम्हाला काही ट्रिक्स वापरून आता ही भेसळ ओळखता येऊ शकते.

दिवाळीत मोठ्या प्रमाणात मिठाई बनवण्यासाठी दुधाची गरज पडते. त्यामुळे दुधात अनेक वेळा पांढरं पाणी किंवा डिटर्जंटचं पाणी मिक्स केलं जातं. ते ओळखण्यासाठी थोड्याशा दुधात पाणी टाकून पाहा जर दुधाला फेस आला तर दुधात डिटर्जंट आहे. किंवा दुधात गरम पाणी टाकल्यास दुधाचा रंग जर पिवळा झाला तर ते सिंथेटीक दुध असल्याचं ओळखता येते.

त्यानंतर दिवाळीत फराळ बनवण्यासाठी मसाल्याची गरज पडते. मसाल्यातील भेसळ ओळखण्यासाठी सर्वप्रथम  थोडं पाणी घ्या. त्यात मसाला पावडर मिक्स करा. ती ओली मसाला पावडर हाताला लावा. जर ती मसाला पावडर लावल्यानंतर तुम्हाला चिकटपणा जाणवला. तर त्या मसाल्यामध्ये साबणाची पावडर बनवून मिसळलेली आहे.

त्यानंतर दिवाळीत सर्वात जास्त मागणी असणाऱ्या आणि त्यातच महाग विकला जाणारा खवा शुद्ध आहे हे कसे ओळखाल?, तर त्यासाठी थोडा खवा एका भांड्यामध्ये घ्या. त्या खव्यामध्ये 2 थेंब आयोडीन टाकायचं आहे. त्यानंतर जर खवा खवा काळा पडला तर त्यामध्ये भेसळ असल्याचं समजून जा. या सोप्या ट्रिक्समधून तुम्ही पदार्थांमधील भेसळ ओळखू शकाल.

थोडक्यात बातम्या-

ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीने मोडलं सर्वसामान्यांचं कंबरडं

नवाब मलिकांच्या जावयाच्या अटक प्रकरणातील मुख्य आरोपीचा मोठा खुलासा, म्हणाला तो गांजा…

“आर्यन खानसोबत जे काही घडलं त्याचं एक आई म्हणून वाईट वाटतं”

इकडे क्रांती रेडकर चिंतेत तर दुसरीकडे आठवलेंच्या कवितांची गाडी सुसाट

एकीकडे सर्वसामान्यांचं दिवाळं तर दुसरीकडे इंधन विक्रीतून केंद्र सरकारची दिवाळी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More