बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लैंगिक शक्ती कशी वाढवाल?; ‘या’ अभिनेत्यानं यूट्यूबवर शेअर केला व्हिडीओ

मुंबई | समाजात शारिरीक शक्ती, मानसीक शक्ती याबद्दल मोकळेपणानं बोललं जातं मात्र लैंगिक शक्तीबाबत मोकळेपणानं बोलताना अजूनही लोक कचरतात. मात्र, सिनेसृष्टीतील अभिनेता विद्युत जामवाल लैंगिक आरोग्याबाबतही मोकळेपणाने व्यक्त झाला आहे. तो त्याच्या अ‍ॅक्शन आणि फिटनेससाठी ओळखला जातो. आपले व्यायामाचे बरेच व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. आता त्यानं सेक्शुअल हेल्थबाबतही काही टीप्स दिल्या आहेत.

विद्युतने लैंगिक समस्येला सामोरं जात असलेल्या पुरुषांसाठी 1 खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने यावर उपाय सांगितला आहे. विशेष म्हणजे त्याने स्वतः हा उपाय करून दाखवला आहे. विद्युतने ‘इरेक्टाईल डिसफंक्शन’बद्दल सांगितलं आहे आणि ही समस्या दूर करण्यासाठी 19 वेगवेगळे व्यायाम त्यानं सांगितले आहेत.

त्याचबरोबर, त्यानं इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं आहे की, ’10 पैकी 1 पुरुषाला याचा त्रास आहे. अशा पुरुषांसाठी मी इथं ‘कलारीसुत्र’चे 19 व्यायाम सांगतो आहे. तुम्ही रोज हे व्यायाम करून शरीरातील रक्त प्रवाह नियमित करू शकता आणि लैंगिक शक्ती मिळवू शकता. निरोगी राहण्यासाठी लैंगिक आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे. आपल्या समाजात याला एक टॅबू मानलं जातं. मात्र, आपल्याला याबाबत मोकळेपणानं बोलण्याची गरज आहे’.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सर्वाधिक प्रभावशाली आणि सर्वोत्तम मार्शल आर्टिस्टच्या यादीत विद्युतचं नाव आलं आहे. विद्युतनेच याबाबत सोशल मीडियावरून त्याच्या चाहत्यांना माहिती दिली होती. जेव्हा तुम्ही गुगलवर माझं नाव सर्च कराल तेव्हा तुम्हाला माझ्या नावासमोर सर्वोत्तम मार्शल आर्टिस्ट लिहिलेलं दिसेल, असं विद्युतनं त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं होतं. या कामगिरीनंतर विद्युतचं नाव जॅकी चॅन, ब्रुस ली, जॉनी ट्राय गुयेन, स्टीव्हन सीगल, डोनी येन या जगभरातील दिग्गजांसोबत दिसणार आहे. ही कामगिरी करणारा विद्युत पहिला भारतीय अभिनेता आहे.

पाहा व्हिडीओ –

 

थोडक्यात बातम्या –

तिनं नग्न व्हायला सांगितलं, ते नग्न झाले; पुण्यात 150 पेक्षा जास्त जणांसोबत धक्कादायक प्रकार

8 वर्षाच्या मुलाला कोविड सेंटरचं टॅायलेट साफ करायला लावलं, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ

आता कोरोनाचा पूर्ण नायनाट होणार?; शास्त्रज्ञांनी विकसित केली अँटी व्हायरल थेरपी

जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून रणजितसिंह डिसले यांची नियुक्ती

हर्षवर्धन पाटील यांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट; सरकारकडे केली ही महत्वाची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More