बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं?; उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला

मुंबई | राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सने राज्यातील बालरोग तज्ञांना मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील डॉक्टर्सशी संवाद साधला.

कोरोना विषाणूची जशी संसर्गाची साखळी असते. तशी आपण आपली देखील एक घट्ट साखळी तयार करून, एकजुटीने या विषाणूचा मुकाबला करु. घाबरू नका, चिंता करू नका, आपल्या फॅमिली डॉक्टर, ज्याला मी माझा डॉक्टर, असं म्हणतो त्याला वेळीच मुलाला दाखवा म्हणजे उपचार लगेच सुरु करता येतील, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.

गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये. याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोना विरुद्ध आपण जी लढाई लढतो आहोत त्यात पूर्ण यश नाही पण रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येतेय. पण यात तुम्ही सगळे डॉक्टर्स, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे सर्व पक्षांचे लोक, सर्वसामान्य नागरिक यांचे हे यश आहे, मी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपी बंद करा- नवाब मलिक

दिलासादायक! महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनामुक्तीचा दर 93 टक्यांवर, सक्रिय रूग्णसंख्याही घटली

विवाहीत गर्लफ्रेंडसोबत तरुणाची आत्महत्या, धक्कादायक कारण आलं समोर

चिमुकल्याला झोप यावी म्हणून डॉक्टरांनी गायलं सुंदर गाणं; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

‘…नाहीतर मेडिकल दुकानदार संपावर जाणार’, राज्य सरकारला दिला 5 दिवसांचा अल्टीमेटम!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More