कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) खातेदारांसाठी युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) हा अत्यंत महत्त्वाचा असतो. हा क्रमांक कायमस्वरूपी राहतो आणि पीएफ खात्याचा ऑनलाईन वापर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. ईपीएफओ खात्याशी मोबाईल नंबर जोडल्यामुळे खातेधारकांना त्यांच्या पीएफ खात्याची माहिती सहज मिळू शकते. जर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर बदलायचा किंवा नवीन नंबर लिंक करायचा असेल, तर तुम्ही अगदी वेळात ते करू शकता.
ईपीएफओ खात्यात मोबाईल नंबर कसा नोंदवायचा? :
– सर्वात प्रथम EPFO सदस्य पोर्टलला भेट द्या – https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/
– UAN सक्रिय करा – “Activate UAN” ऑप्शनवर क्लिक करा.
– आवश्यक माहिती भरा – यूएएन नंबर, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि नवीन मोबाईल नंबर टाका.
– ओटीपी प्रमाणीकरण – Get Authorization PIN वर क्लिक करून तुमच्या मोबाईलवर आलेला OTP टाका.
– नंबर लिंक करा – OTP प्रमाणीकरणानंतर तुमचा मोबाईल नंबर यशस्वीपणे नोंदणी केला जाईल.
ईपीएफओ खात्यात मोबाईल नंबर कसा बदलायचा? :
– ईपीएफओ सदस्य पोर्टलवर लॉगिन करा – तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून खाते लॉगिन करा.
– संपर्क तपशील व्यवस्थापित करा – “Manage” विभागात जाऊन “Contact Details” वर क्लिक करा.
– मोबाईल नंबर बदला – “Change Mobile Number” ऑप्शन निवडा आणि नवीन मोबाईल नंबर दोनदा टाका.
– ओटीपी प्रमाणीकरण – “Get OTP” वर क्लिक करा आणि नवीन नंबरवर आलेला OTP प्रविष्ट करा.
– नंबर अपडेट करा – OTP पडताळणी पूर्ण झाल्यानंतर “Submit” बटणावर क्लिक करा.