बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लड़ोगे नहीं तो जीताेगे कैसे?”, प्रियंका गांधींचा पारा चढला

लखनऊ | आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमुळे (Uttar Pradesh Legislative Assembly elections) उत्तर प्रदेश राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. उत्तर प्रदेश काँग्रेस (Congress) प्रभारी प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी प्रतिज्ञा यात्रेत भाजप (BJP) , समाजवादी पक्ष (SP) आणि बहुजन समाज पक्षावर(BSP) निशाणा साधला आहे. प्रियंका गांधी यांनी मुरादाबाद येथे बोलताना शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावर भाष्य केंद्र सरकारवर (Central Government) टीकास्त्र सोडले आहे.

‘काँग्रेसने शेतकरी आंदोलन मजबूत करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी दिल्लीत शेतकऱ्यांबरोबर टॅक्टर चालवण्यापासून असे अनेक प्रसंग आहेत की, काँग्रेस नेत्यांनी कृषी कायद्याविरोधात केंद्र सरकारशी संघर्ष केला आहे’, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे. लढणार नाही तर जिंकणार कसे?, असं आक्रमक वक्तव्य करत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली. परिणामी सरकारला झुकावं लागलं आणि तीन कृषी कायदे मागे घ्यावे लागले, असं म्हणत प्रियंका गांधी यांनी  केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे. यावेळी प्रियंका गांधी यांनी शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याचं आश्वासन दिलं आहे. काँग्रेस पक्षाने कारागिर आणि विणकरांसाठी अनेक योजना केल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, गेल्या एक वर्षांपासून कृषी कायदे मागे घेण्यासाठी शेतकरी आंदोलन करत होते. आता भाजप सरकारने तीन कृषी कायदे रद्द करून शेतकऱ्यांच्या नजीक जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच शेतकरी संघटना शेती मालाला हमीभाव कायदा करण्यासाठी ठाम आहेत.तसेच कृषी कायदे मागे घेतल्यानंतरही सपा आणि आरएलडी मुस्लीम आणि जाट मतांच्या मदतीने आपली राजकीय नौका चालवण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘मिस यु आई’ म्हणत एअरपोर्टवर गेला अन् आईनी चपलेने धुतलं; पाहा मजेशीर व्हिडीओ

“अनिल परबांची तेवढी ताकद नाही, मंत्री म्हणून जी संविधानिक उंची लागते ती…”

“तेव्हा मला माझीच लाज वाटली, कोणीतरी कानाखाली मारल्यासारखं वाटलं”

Omicron मुळे तिसरी लाट येणार?, आली ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

चक्रीवादळाचा धोका! ‘या’ तीन राज्यांना अलर्ट जारी, रेल्वे गाड्या देखील रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More