Walmik Karad | बीड मधील सरपंच हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरून गेलाय. गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यामध्ये राजकीय नेत्यांनी देखील आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. बीडच्या प्रकरणामुळे अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनी तर त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वाल्मिक कराड (Walmik Karad) याने काल सीआयडीसमोर शरणागती पत्करली. याच कराडचे मुंडे यांच्यासोबत जवळचे संबंध आहेत.
वाल्मिक कराड काल (31 डिसेंबर) स्वतः सीआयडीसमोर सरेंडर झाला. त्यानंतर केजमधील कोर्टाने कराडला 15 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. त्याची तुरुंगातील पहिली रात्र कशी गेली याबाबत आता मोठा खुलासा समोर आलाय. रात्री उशिरापर्यंत कराडबाबत कोर्टात सुनावणी झाली. त्याला 15 दिवसांची सीआयडी कोठडी देण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याची रवानगी तुरुंगात केली.
वाल्मिक कराडची तुरुंगात रात्र कशी गेली?
काही मीडिया रिपोर्टनुसार, कराड याने रात्रीपासून जेवण घेतले नाही. सकाळी नाश्ताही केला नाही. कराडला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे. मात्र, तरीही त्याने जेवण घेतले नाही. रात्री कराड हा ऑक्सिजन लावून झोपला होता,अशी माहिती काही मीडिया रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
रात्री उशिरा तुरुंगात गेल्याने वाल्मिक कराड हा सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उठला. सकाळी त्याने चहा, नाश्तादेखील घेतला नाही. वाल्मिक कराडला मधुमेहचा त्रास असल्याने त्याने आग्रह केल्यानंतर सकाळी 11.30 वाजता सरकारी जेवण घेतले. त्याने साधारण अर्धी चपाती खाल्ली असल्याची माहिती आहे.
मस्साजोग गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे यांना अटक करण्यात आली आहे. तर, मुख्य आरोपी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे फरार आहेत. तर वाल्मिक कराडला कालच ताब्यात घेण्यात आलंय. त्याची आता चौकशी सुरू आहे. (Santosh Deshmukh Murder case )
दुसरीकडे इतर आरोपींना कधी ताब्यात घेणार?, असा संतप्त सवाल करत आज (1 जानेवारी) मस्साजोगमधील गावकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. एक तर तुम्ही तिन्ही आरोपींना अटक करा. त्यांना कधी अटक करणार याची तारीख सांगा. नाही तर आम्हाला गोळ्या तरी घाला, अशी संतप्त भावना यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली.
News Title : How Walmik Karad spent his night in jail
महत्त्वाच्या बातम्या-
बीडमध्ये घडामोडींना वेग! फरार आरोपींच्या तपासासाठी CID ने उचललं मोठं पाऊल
सलमानच्या एक्स गर्लफ्रेंडचा खळबळजनक खुलासा, भर कार्यक्रमात म्हणाली ‘तो मला खूप…’
मस्साजोगच्या गावकऱ्यांचा अत्यंत धक्कादायक निर्णय, बघून पोलीसही हादरले
सरपंच हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले संदर्भात मोठी अपडेट समोर!
‘इथे सापडला की ठोकला’; वाल्मिक कराड शरण आल्यानंतर वसंत मोरेंचं मोठं वक्तव्य