बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

व्हॉट्सअॅप मेसेज पुर्णपणे सुरक्षित तरी कसे होतात प्रायव्हेट चॅट, फोटो लीक; वाचा सविस्तर

नवी दिल्ली | सोशल मीडिया अॅपमध्ये व्हॉट्सअॅप सर्वात जास्त वापरलं जाणारं मेसेजिंग अॅप आहे. जगभरातील प्रत्येक ठिकाणी दररोज व्हॉट्सअॅपद्वारे लोक लाखो-करोडो मेसेज करत असतील. अशात व्हॉट्सअॅप हे सर्व मेसेज सुरक्षित कसे ठेवतो असा प्रश्न साहजिकच पडतो. कंपनीने ते कोणाचेही खासही मेसेज वाचू शकत नसल्याचं सांगितलं आहे, कारण वापरकर्त्याचे मेसेजेस इनक्रिप्टेड असतात. हे मेसेज शेवटपर्यंत वापरकर्त्यालाच पाहता येतात. तरीदेखील चॅट लीक झाल्याचं अनेकदा समोर येतं.

व्हॉट्सअॅप चॅटचा बॅकअप गुगल ड्राईव्हवर जातो. वापरकर्ता स्वत: आपल्या ईमेल आईडीनं गुगल ड्राईव्हला लिंक करू शकतात. व्हॉट्सअॅपच्या चॅट बॅकअप सेटिंग्समध्ये हे पाहता येतं. अधिकतर वापरकर्ते चॅटचा ऑडिओ बॅकअप ठेवतात, जेणेकरुन वेळोवेळी चॅट्सचा बॅकअप गुगल ड्राईव्हमध्ये जाईल. यामुळे जुने चॅट्स शोधण्यास आणि फोन बदलल्यानंतर ते परत मिळवण्यास मदत होते. मात्र मेसेज, चॅट लीक होण्यामागे हेच कारण आहे.

व्हॉट्सअॅप चॅट्स एंड-टू-एंड इनक्रिप्टेड आहेत. म्हणजेच ते तुमच्याशिवाय इतर कोणाला वाचता येऊ शकत नाही. पण गुगल ड्राईव्हवर जे चॅट बॅकअप होतात, ते एंड-टू-एंड इनक्रिप्टेड नाहीत. म्हणजे ते कोणीही वाचू शकतात. चॅटमध्ये जे काही फोटो, व्हिडीओ असतील, ते सर्व गुगल ड्राईव्हवर सेव्ह होतात. जर वापरकर्त्याच जीमेल अकाऊँट अ‍ॅक्सेस केलं, तर अनेक चॅट हिस्ट्री आणि बॅकअपसह फोटोही मिळतील. बऱ्याच प्रकरणात हीच बाब समोर आली आहे, की चॅट बॅकअपमुळे प्रायव्हेट फोटो किंवा चॅट लीक झाले आहेत.

दरम्यान, व्हॉट्सअॅपने ते कोणत्याही वापरकर्त्याचं चॅट वाचत नसल्याचं सांगितलं आहे. तसच वापरकर्त्याचं चॅट एंड-टू-एंड इनक्रिप्टेडमुळं सुरक्षित असल्याचाही दावा व्हॉट्सअॅपनं केला आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनाच्या या भारतीय लस कंपनीला मोठा झटका, लसीच्या आतप्कालीन वापरासाठी अमेरिकेचा नकार

अंधश्रद्धेचा कळस! ‘या’ कारणामुळे पाच वर्षाच्या मुलाला मातीत पुरलं अन्….

भारतीय संघात निवड होणारा पिंपरी-चिंचवडचा ‘हा’ पहिलाच क्रिकेटपटू

“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला धमकी”

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याची घरवापसी, मोदींचा तो फोन कॉलही नाही रोखू शकला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More