नागपूर महाराष्ट्र

मोदी फकीर, त्यांना महागाई कशी कळणार?- अजित पवार

अमरावती | मोदी फकीर असल्याने त्यांना महागाई कशी कळणार?, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकारवर घणाघात केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन सभेवेळी ते बोलत होते. 

विकासाची स्वप्ने दाखवून सत्तेत आलेल्या मोदी सरकारच्या काळात सर्व विकासकामे रखडली आहेत. महागाईने सर्वसामान्यांचे जगणे कठीण केलं आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याविषयीची जाणीव असण्याचे कारण नाही, असंही पवार म्हणाले. 

माजी मंत्री जयंत पवार, छगन भुजबळ, अनिल देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार सुलभा खोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. 

दरम्यान, बाबा रामदेव 2014 पूर्वी खूप बोलायचे. मोदी आणि भाजप निवडून देण्याचे आवाहन ते करीत होते. मात्र आता ते मौन झाले आहेत. असं का होत आहेे? असा सवालही पवार यांनी यावेळी केला. 

महत्वाच्या बातम्या-

-माझी पुन्हा फसवणूक केल्यास, सरकारला उघडं पाडू- अण्णा हजारे

सत्तेसाठी अर्धकमळ छातीवर लावून फिरतील; निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

-नरेंद्र मोदी ‘जुमला राजा’ आणि त्यांची राजवट ‘चौपटराज’- राहुल गांधी

रणवीरचा अतिउत्साहीपणा नडला; चाहते जखमी

-“भाजप लादू पाहणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेत टिकू देणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या