बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?”

मुंबई | सध्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये युतीची चर्चा रंगू लागली आहे. औरंगाबादमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात युतीच्या चर्चांची ठिणगी पडली आहे. अशातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना भवनात जाऊन तोडफोड करण्याची भाषा काही लोकांनी केली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची, शिवसेना भवन फोडण्याची भाषा करणाऱ्यांशी युती कशी होणार?, असा सवाल करत संजय राऊत यांनी युतीची शक्यता फेटाळून लावली आहे.

पुढे राऊतांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे जे व्यासपीठावर बोलले, ते तिथंच संपलं. युती आम्ही तोडली नाही. त्यांनीच तोडली. महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात पुढे जात आहे. त्यामुळे आमचं चांगलं चाललं आहे, असं बोलत संजय राऊत यांनी युतीच्या चर्चांवर एक प्रकारे पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं. व्यासपीठावरचे आजी माजी सहकारी आणि भविष्यातील सहकाऱ्यांचं स्वागत असं ते म्हणाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

मास्क न घातल्यामुळे महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यासोबत केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

तुम्ही कारणं सांगू नका, जरा माझ्या गतीने कामं करा- अजित पवार

कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून तरुणानं उचललं ‘हे’ धक्कादायक पाऊल

आयकर विभागाने घेतले हे तीन मोठे निर्णय, वाचा काय आहेत?

बाॅयफ्रेंडने गर्लफ्रेंडसाठी बनवले अजब नियम, वाचून तुम्हालाही बसेल धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More