बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये”

बुलडाणा | गेल्या काही महिन्यात अतिवृष्टी झाल्यामुळे विदर्भातील तसेच मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. त्यामुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर बुलडाण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला महत्त्वाचेे आदेश दिले आहेत.

बुलडाणा जिल्ह्यात महिन्यात 1 जून 2021 ते 24 ऑक्टोबर या कालावधीत एकूण 90 महसूल मंडळापैकी 53 मंडळात अतिवृष्टी झाली. त्यामुळे नदी, नाले आणि ओढे यांनाही मोठ्या प्रमाणात पूर आला. त्यामुळे शेतात पाणी साचून त्या पाण्याचा निचरा न झाल्यामुळे शेतीचं नुकसान झालं. अशा परिस्थितीत यंत्रणांनी पंचनामे केले, तरी नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, असे आदेश शिंगणे यांनी दिले आहेत.

जोरदार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 7,34,722 लागवडीखालील क्षेत्रापैकी अतिवृष्टी आणि पुरामुळे  शेतकऱ्यांचे 1,36,208 हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. तसेच ऑक्टोबरमध्ये जिल्हयातील एकूण 3,88,773 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले असून एकूण लागवडी खालील क्षेत्राच्या 53 टक्क्यांच्या आसपास क्षेत्र पावसामुळे बाधित झालं होतं.

दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा राज्यातील अनेक नेत्यांनी पाहणी दौरा केला होता. त्यामध्ये विरोधी पक्षांनी पंचनामे न करता थेट मदत शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

पुन्हा राज्यानं पाहिला नानाभाऊंचा कणवाळूपणा! लोककलावंताला दिलं हक्काचं घर

विराट कोहलीने ठोकलं दमदार अर्धशतक! पाकला दिलं ‘इतक्या’ धावांचं आव्हान

लखीमपूर खीरी घटनेतील मुख्य आरोपीला झाली डेंग्युची लागण

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More