बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्यापासून राज्यात मुसळधार पाऊस! ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

नाशिक | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला होता. त्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर केलं. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागने व्यक्त केली आहे.

राज्यात या वर्षी 4 महिने 9 दिवस पाऊस कोसळला. मागील काही दिवसांपासून परतीच्या पावसाची वाट नागरिक पाहत होते.  राज्यात निर्धारीत वेळेच्या पाच दिवस आधीच मान्सूनचे आगमन झालं होतं. आता मात्र पावसाने चार दिवस मुक्काम ठोकत गुरूवारी अखेर पावसाने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात मंगळवारी आणि बुधवारी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, ओरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या दहा जिल्ह्यातं येलो अलर्ट जारी केला आहे. त्याठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या 48 तासात ओडिशा राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. याचा फटका  मराठवाड्यातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहवे, असं हवामान विभागाकडून सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

”पंकजा मुंडेंचे हेलिकॅाप्टर फिरलं नाही तर कोणी आमदार खासदार होत नाही”

“सूरज सा तेज नहीं मुझमे, दीपक सा जलता देखोंगे, तुम मुझको कब तक रोकोगे”

‘त्यांनी आपलं मंत्रिपद भाड्यानं दिलंय’; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

“गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात सांगितलं होतं, हा महादेव जानकर मेला तरी…”

“मी भाजपला सांगते, आता तारखा देणं बंद करा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More