आरोग्य कोरोना देश

केंद्र सरकारनं लाँच केलं जगातलं सगळ्यात स्वस्त कोरोना टेस्ट किट!

नवी दिल्ली | भारतात कोरोना चाचणीचे दर सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर आहेत. कोरोना चाचणीचे हे महागडे दर लक्षात घेऊनच केंद्र सरकारने आज स्वस्तातील करोना टेस्ट किट लाँच केलं.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल निशंक आणि मनुष्यबळ खात्याचे राज्यमंत्री संजय धोत्रे या दोघांनी मिळून आज सगळयात स्वस्तातील कोरोना टेस्ट किट लाँच केलं. दिल्ली आयआयटीने या स्वस्तातील कोरोना टेस्ट किटची निर्मिती केली आहे.

न्यूटेक मेडिकल कंपनी हे किट बाजारात उपलब्ध करणार आहे. ‘कोरोश्योर’ असं या किटचं नाव आहे. ‘कोरोश्योर’ मुळे देशात कोरोना चाचण्यांच्या पद्धतीमध्ये मोठा बदल होईल. चाचण्यांची संख्या आणि किंमत यामध्ये फरक दिसेल. न्यूटेक मेडिकल कंपनी आयआयटी दिल्लीची टेक्नोलॉजी वापरणार आहे, असं आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव यांनी सांगितलंय.

दरम्यान, परवडणाऱ्या दरात महिन्याला 20 लाख चाचण्या करणं शक्य आहे, असं आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव म्हणाले. या किटला आयसीएमआर आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने परवानगी दिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबादच्या तरुणाच्या वेबपोर्टलची किमया; कोरोना काळात थेट गुगलनं केली आर्थिक मदत

‘भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत’; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

मुलीचं प्रेम बापाला नव्हतं मान्य; पुण्यात प्रियकराची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

‘दोन दिवसात उत्तर द्या अन्यथा…’, सचिन पायलट यांना काँग्रेसची नोटीस

…म्हणून 25 वर्षीय महिलेनं महिला पोलिसाचा हात पिरगळला; महिलेला अटक

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या