बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर आज महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असती”

लखनऊ | उत्तर प्रदेश विधानसेभेचे अध्यक्ष ह्रदयनारायण दिक्षीत यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या उत्तर प्रदेशचं राजकारण तापलेलं दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातील बंगार्माऊ मतदारसंघात एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ह्रदयनारायण दिक्षीत यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

महात्मा गांधी गरजेपुरते कपडे घालायचे. ते केवळ धोतर गुंडळायचे. देश त्यांना बापू म्हणून संबोधत असत. कमी कपडे घातल्याने कोणी महान होत असेल तर महात्मा गांधी यांच्यापेक्षा राखी सावंत महान ठरली असली असती, असं वक्तव्य ह्रदयनारायण दिक्षीत यांनी केलं आहे.

माझ्यामते कोणत्याही विषयावर कोणी पुस्तक लिहिल्यामुळे कुणी बुद्धीमान बनत नाही. अनेक वर्षापासून अशीच स्थिती असली तर मी किमान सहा हजार पुस्तकं वाचली आहेत, असंही ह्रदयनारायण दिक्षीत यांनी म्हटलं आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, दिक्षीत यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ट्विट करत यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून काही मित्र चुकीचा अर्थ काढला जात असल्याचं ह्रदयनारायण दिक्षीत यांनी म्हटलं आहे

थोडक्यात बातम्या-

Altroz CNG च्या प्रतिक्षेत असलेल्या कार चाहत्यांसाठी खुशखबर, कार होतेय लाँच, जाणून घ्या किंमत!

‘मीडियाची मदत घेत सोमय्या खोटे आरोप करत…’; मनिषा कायंदेंचा सोमय्यांवर घणाघात

भाजपने ‘ती’ प्रथा मोडली, थोरांतांनी करून दिली प्रमोद महाजनांची आठवण

अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात राज कुंद्राला न्यायालयाकडून जामीन मंजूर

ठरलं तर! काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More