महाराष्ट्र मुंबई

ऋतिक-कंगणा प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून गुन्हे शाखेकडे; कंगणा संतापली, म्हणाली…

मुंबई | अभिनेता ऋतिक रोशनने 2016-17 मध्ये सायबर सेलमध्ये दाखल केलेली एक तक्रार मुंबई पोलिसांनी क्राइम इंटेलिजन्स युनिटकडे वर्ग केली आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऋतिक रोशनच्या वकिलांनी हे प्रकरण वर्ग करण्यासंबंधी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना विनंती केली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

कंगणा राणावतने ऋतिक रोशनची बदनामी करण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याप्रकरणी 2016 साली तिच्याविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला होता. सायबर सेलकडून या प्रकरणाचा तपास सुरु होता. परंतु आता हा तपास गुन्हे शाखेच्या सीआययू युनिटकडे वळवण्यात आला आहे. सायबर सेलनेच तपासानंतर हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग केलं आहे.

यानंतर कंगणा राणावत चांगलीच भडकली आहे. तिने ऋतिक रोशनला टॅग करत एका छोट्याश्या अफेयरसाठी किती काळ रडणार?, असा प्रश्न विचारला आहे. तसेच जेव्हा मी माझ्या व्यक्तीगत आयुष्यात थोडं धैर्य गोळा करण्याचा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करते तेव्हा याची नाटकं पुन्हा सुरु होतात, असं कंगणा म्हणाली.

थोडक्यात बातम्या-

गुड न्यूज! अमेरिकेमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात, आरोग्य सेविकेला दिला पहिला डोस

अधिवेशन आणि कॅबिनेटच्या बैठका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नको आहेत- नारायण राणे

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर मी पुन्हा उपोषणाला बसणार- अण्णा हजारे

‘आधी आमदार-खासदारांना कोरोनाची लस द्या’; हरियाणा सरकारचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला पत्र

“काँग्रेसच्या डावपेचांचा शोध लावायचो, तेव्हा कळायचं त्यामागे अहमदभाई आहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या