बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून हृतिक रोशनने 75 कोटींची ती ऑफर धुडकावली!

मुंबई | अभिनेता हृतिक रोशनने त्याच्या दर्जेदार लूक, जबरदस्त डांन्स आणि दमदार फिटनेसने चित्रपटसृष्टीत आपलं एक खास स्थान निर्माण केलं आहे. भारतात हृतिकचे चाहते खूप आहेत. त्यासोबतच परदेशातही त्याची चांगलीच क्रेझ आहे. हृतिक रोशन विचारपूर्वक आणि इतर चित्रपटांपेक्षा हटके पटकथा निवडतो. यामुळे हृतिकने कमी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेत.

हृतिक एका प्रसिद्ध कादंबरीवर आधारित वेब सीरिजचा हिंदी रिमेक करणार असल्याची चर्चा होते सुरू आहे. त्यासाठी हृतिक रोशनला निर्मात्यांनी 75 कोंटीची ऑफर देण्याचंही मान्य केलं होतं. इतकी मोठी ऑफर देऊनही हृतिकने वेब सीरिज नाकारली आहे.

‘द नाईट मॅनेजर’ ही ब्रिटनमध्ये प्रचंड गाजलेल्या वेब सीरिजचा हिंदी रिमेक करण्यासाठी निर्मात्यांकडून हृतिकची निवड करण्यात आली होती. ही वेब सीरिज हृतिकला देखील आवडली होती. त्यामुळे सुरुवातीला हृतिकने काम करण्यासाठी सहमती दर्शवली.

हृतिकने वेब सीरिज आणि मोठी ऑफर नाकारल्यामागील कारण म्हणजे त्याचं व्यस्त वेळापत्रक आहे. वेब सीरीजचं शुटिंग यावर्षी एप्रिलमध्ये सुरू होणार होतं. हृतिकचं वेळापत्रक आणि या वेब सीरिजच्या चित्रीकरणाची वेळ जुळत नसल्याने त्याने नकार दिला आहे. हृतिकने वेब सीरिज मधून काढता पाय घेतल्याने त्याचे चाहते आणि प्रोडक्शन टीम नाराज झाली आहे.

थोडक्यात बातम्या

अभिनेत्री निया शर्माचा हाॅट अंदाज; चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंटचा पाऊस

होय, आम्हीच कोरोना पसरवला’; अखेर तबलिगींनी दिली कबुली

पिंपरीत सातव्या मजल्यावरुन पडून 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू!

तरूणाने गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून पोलीसही हादरले

कोरोना लसीकरणाबाबत प्रकाश जावडेकरांनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More