मनोरंजन

…म्हणून ऋषभ पंतने केलं उर्वशीला ब्लाॅक

मुंबई | बाॅलिवूडमधील अभिनेत्री उर्वशी रौतेला भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतला डेट करत असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, ऋषभने उर्वशीला व्हॉट्सअ‌ॅपवर ब्लाॅक केल्याचं कळतंय. उर्वशी सतत संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याने ऋषभने हा निर्णय घेतल्याचं समजत आहे.

उर्वशी सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. ती तिच्या चित्रपटांपेक्षा प्रेम प्रकरणासाठी अधिक चर्चेत असते. उर्वशी सध्या ऋषभला डेट करत असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र, दोघांनीही आता संपर्क न साधण्याचा निर्णय घेतला असल्याचे उर्वशीच्या स्पोकपर्सनने सांगितलं आहे.

ऋषभने सोशल मीडियावर गर्लफेंड इशा नेगीसोबतचा फोटो शेअर करत उर्वशीसोबत असणाऱ्या प्रेम प्रकरणांच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे ऋषभची खरी गर्लफेंड कोण हे आता स्पष्ट झालं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उर्वशीचा पागलपंती हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र, या चित्रपटाने बाॅक्स ऑफीसवर फारशी कमाई केली नाही. आता ती एका तमिळ चित्रपटासाठी काम करत असल्याची माहिती आहे.

ट्रेंडिग बातम्या-

…म्हणून बारामतीकरांनी मुंबईला येऊ नये; अजित पवारांचा सल्ला

विद्यार्थ्यांना मारहाण करत असाल तर शांत बसणार नाही- फादर दिब्रिटो

रोहितला निवडून आणण्यासाठी बारामतीकरांनी जीवाचं रान केलं- अजित पवार

जेएनयूतील वादावर सनीची तिखट प्रतिक्रिया, म्हणते…

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या