पुणे महाराष्ट्र

बारावीच्या निकालाची तारीख जाहीर, उद्या दुपारी ‘या’ तीन वेबसाईटवर पाहता येणार निकाल

पुणे | गेल्या अनेक दिवस प्रतीक्षा असलेल्या राज्यातील बारावीच्या परीक्षेचा निकाल अखेर जाहीर होणार आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 16 जुलै रोजी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येईल.

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुरुवारी 16 जुलै रोजी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. उच्च माध्यमिक बारावी परीक्षेचा निकाल फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये पार पडली परीक्षा. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली.

कोरोना संकटामुळे दहावी आणि बारावीचे निकाल लांबले आहेत. एरव्ही मे महिन्यात जाहीर होणारा बारावीचा निकाल जाहीर होण्यासाठी यंदा जुलै महिना उजाडला. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनीही 15 जुलैपर्यंत बारावीचा तर जुलैअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होईल असं सांगितलं होतं.

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरत होत्या. मात्र आज बोर्डाने बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून राजकीय कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या नको’; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

“राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी राजू शेट्टींनी ताळतंत्र सोडलं ”

‘कोरोना झाल्यास मला सरकारी रूग्णालयातच दाखल करा’; देवेंद्र फडणवीसांनी केला ‘या’ नेत्याला फोन

2019 वर्ल्डकपच्या शेवटी ताण कमी करण्यासाठी बेन स्टोक्सने केलं असं काही…..

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाची CBI चौकशी होणार का? अमित शहा म्हणाले….

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या