शिक्षण बोर्डाचा भोंगळ कारभार, 12वीच्या विद्यार्थ्यांवर 7 गुणांची खैरात

मुंबई | शिक्षण बोर्डाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. रसायनशास्त्र पेपरमधील 4 चुकीच्या प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांवर 7 गुणांची खैरात होणार आहे. 

28 फेब्रुवारीला रसायनशास्त्राचा पेपर होता. पेपरवेळी 4 प्रश्न चुकीचे असल्याचं लक्षात आलं. मुख्यनियंत्रकांनी घेतलेल्या बैठकीत विद्यार्थ्यांना 7 गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

धक्कादायक बाब म्हणजे 12वीचे पेपर काढण्याचं काम तज्ज्ञांकडून केलं जातं. मात्र अशाप्रकारे पेपरमध्ये चुका होत असतील तर दोषींवर कारवाई केली पाहिजे, असे सूर उमटताना दिसत आहेत.