HSRP Number Plate | तुमच्या गाडीला उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी (High Security Registration Plate -HSRP) नसल्यास 1 एप्रिलपासून मोठा दंड भरावा लागू शकतो, कारण सर्व वाहनांसाठी आता HSRP क्रमांक पट्टी अनिवार्य करण्यात आली आहे.
HSRP क्रमांक पट्टी म्हणजे काय?
पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले (Swapnil Bhosale) यांनी HSRP क्रमांक पट्टीची किंमत आणि नोंदणी कशी करावी, याबाबत माहिती दिली आहे. 31 मार्च 2019 पूर्वीच्या गाड्यांना साधी नंबर प्लेट होती. परंतु, आता त्यांनादेखील उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी बंधनकारक करण्यात आली आहे.
HSRP क्रमांक पट्टी ॲल्युमिनियमपासून बनवलेली असते. त्यावर एक होलोग्राम (Hologram) असतो, जो क्रोमियम (Chromium) आधारित असतो. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनाचा संपूर्ण तपशील असतो. सुरक्षिततेसाठी, उच्च सुरक्षा क्रमांक पट्टीवर एक विशिष्ट लेझर कोड (Laser Code) छापलेला असतो. प्रत्येक वाहनासाठी वेगवेगळा कोड दिला जातो, जो सहज काढता येत नाही.
तुमच्या गाडीला उच्च सुरक्षा क्रमांक पट्टी नसल्यास, तुम्हाला https://mhhsrp.com या संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. त्यानंतर गाडीचा क्रमांक, चेसिस क्रमांक (Chassis Number), इंजिन क्रमांक (Engine Number) आणि मोबाईल क्रमांक भरून अर्ज सादर करावा.
वाहतूक पोलिसांनी वाहनधारकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पोर्टलवर नोंदणी करून, सोयीनुसार अपॉइंटमेंट (Appointment) घेऊन क्रमांक पट्टी बसवून घ्यावी. (HSRP Number Plate)
HSRP क्रमांक पट्टीची किंमत
एचएसआरपी (HSRP) क्रमांक पट्टीची किंमत मोटारसायकल आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये + जीएसटी (GST), तीन चाकी वाहनांसाठी 500 रुपये + जीएसटी, तर चारचाकी आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये + जीएसटी आहे.
Title : HSRP Number Plate Mandatory Register Immediately to Avoid Penalty