बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी मागासवर्गीय असल्यामुळे…’; समीर वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे धाव

मुंबई | राज्यात मागील काही आठवड्यांपासून मुंबईतील क्रूझ ड्रग्स प्रकरण राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर विविध गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडेंनी मुस्लीम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्रांचा गैपवापर केल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. त्यावर आता समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचं दार ठोठावलं आहे.

आपण मागासवर्गीय असल्यामुळं आपल्याला त्रास दिला जात आहे. मागासवर्गीय असल्याने आपल्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत, अशी तक्रार समीर वानखेडे यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे केली आहे. नागरी सेवा उत्तीर्ण होत असताना समीर वानखेडेंनी दाखवलेले प्रमाणपत्र हे खरं असून फक्त बदनामी करण्यासाठी कटकारस्थान रचले जात आहेत, असं त्यांनी केलेल्या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे.

आपण नागरी सेवेमध्ये सादर केलेले सर्व कागदपत्रं ही योग्य आहेत. त्यामध्ये कोणतीही छेडछाड केलेली नाही. त्यामुळे मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळं मला त्रास होत आहे, असं समीर वानखेडेंनी मागासवर्गीय आयोगाकडे आपलं म्हणणं मांडलं आहे.

दरम्यान, जे खरं आहे ते समोर आणावं आणि त्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती समीर वानखेडेंनी मागासवर्गीय आयोगाकडे केली आहे. तसेच समीर वानखेडेंच्या बहीण यास्मिन वानखेडेंनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. आपल्याला ऑनलाईन धमक्या येत आहेत, असं यास्मिन यांनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

राज्यातील ‘लाल परी’ वाहतूक बंद; एसटी कर्मचाऱ्यांचे उपोषण आंदोलन

विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! MPSCची ‘इतक्या’ जागांसाठी जम्बो पदभरती

मी भाजप पुरस्कृत असतो तर… – खासदार संभाजीराजे

“भाजप आता गुन्हेगारांच्या जोरावर निवडणूक लढवणार का?”

“आज बाळासाहेब नाही पण तुम्ही आहात…”, क्रांती रेडकरचं मुख्यमंत्र्यांना भावनिक पत्र

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More