अकोला | दसऱ्याच्या ( Dasara ) दिवशी रावण दहन करण्याची प्रथा आहे. अन्याय आणि अंहकाराचे प्रतिक म्हणून रावणाच्या पूतळ्याचं दहन केलं जातं. भारतातील काही आदिवीसी समुदायामध्ये रावणाची पुजा केली जाते. गेल्या अनेक वर्षांपासून आदिवासी समाजाने या प्रथेला विरोध केला आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते आ. अमोल मिटकरी (Amol mitakari) यांनीही रावण दहनाच्या प्रथेला विरोध केला आहे. यासाठी ते हिवाळी आधिवेशनात अवाज उठवणार आहेत. त्यामुळे नव्या वादाला तोंड शक्यता आहे.
आकोल्यातील सांगोळा गावात रावणाचे 350 वर्ष जुनं मंदीर आहे. या मंदिराच्या सभागृहाच्या बांधकामासाठी अमोल मिटकरींनी त्यांच्या आमदार निधीतून 20 लाख मंजूर केला. त्या कामाचं भूमिपुजन त्यांनी केलं. त्यावेळी त्यांनी रावण दहनाच्या प्रथेला विरोध केला.
मिटकरी म्हणाले, आदिवासी समाजाच्या भावना रावणासोबत आहेत. रावण आदिवासी समजाचं दैवत असेल तर, दहन कशाला? त्यामुळे या प्रथेवर बंदी घातली पाहिजे. लंकेचा राजा रावणाच्या पुतळ्याचं दहन कशाला? असे प्रश्न उपस्थित करत आहेत. आपण रावणाच्या दहनाच्या प्रथेवर बंदीसाठी हिवाळी आधिवेशनात आवाज उठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भंडारा जिल्यातील आदिवासी संघटनांनी रावण दहन प्रथेला विरोध केला. आखिल भारतीय आदिवासी परिषद, ऑल इंडिया आदिवासी पीपल्स फेडरेशन या संघटनांनी जिल्हा प्रशासनाला रावण दहन बंदीसाठी निवेदन दिलं. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने रावण दहन प्रथेवर बंदी घतली आहे. त्यामुळे भंडारा जिल्हात रावण दहन करता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या