बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘खाकी’तली माणुसकी! रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या महिलेची आणि तिच्या बाळाची महिला काॅन्सटेबलनं केली मदत

लखनऊ| देशात सर्वत्र कोरोनाचा कहर पहायला मिळत आहे. कोरोना काळात एकीकडे माणूस माणसाला टाळू लागला आहे. तर दुसरीकडे काही लोक माणुसकी जिवंत असल्याची अनुभती देत आहेत. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोतून निदर्शनास येत आहे.

व्हायरल होणारा हा फोटो उत्तर प्रदेशातील असून सचिन कौशिक नावाच्या व्यक्तीनं ट्विटरवर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये एक महिला कॉन्स्टेबल भर रस्त्यात एका आधार नसलेल्या महिलेची मदत करताना दिसत आहे.

या फोटोसोबत त्यांनी म्हटलं की, ‘आई गरमीनं बेशुद्ध झाली आणि रस्त्याच्या कडेला पडली. लहान बाळ बाजूला रडत आहे. ड्युटी करत असलेल्या रीनाची महिलेवर नजर पडली. रीनानं महिलेला पाणी पाजलं. नंतर शुद्धीवर आल्यावर महिलेला घरी पोहोचवण्याची व्यवस्थाही केली.

दरम्यान, या फोटोनं सर्वांचंच मन जिंकलं आहे. अनेकजण या फोटोला पाहून भावूकही झालेले पहायला मिळाले. या फोटोवर आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनीही कमेंट केली आहे. त्यांनी लिहिलं की, ‘कौतुकास्पद काम रीना. #ISaluteHer. हैराणी आणि दु:खाची बाब म्हणजे कोणत्याही स्थानिक व्यक्तीनं येणाऱ्या जाणाऱ्यानं या महिलेची मदत केली नाही’.

 

थोडक्यात बातम्या – 

भोरमध्ये मुळशी पॅटर्नचा थरार! भरदिवसा माजी सरपंचावर प्राणघातक हल्ला

सुशांत सिंह राजपूतच्या पहिल्या पुण्यतिथी आधीच रियाची भावनिक पोस्ट, म्हणाली….

पुरुषांनो तुम्ही तुमची प्रेग्नन्सी टेस्ट केली अन् त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर…

लॉकडाऊनमध्ये दारू विकण्यासाठी केला अनोखा जुगाड, पाहा व्हिडीओ

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; सक्रिय रूग्णसंख्याही घटली

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More