बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘खाकी’तली माणुसकी! बेघर महिलेला पोलिसानं स्वतःच्या हातानं खाऊ घातलं

मुंबई | देशात सर्वत्र कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोना काळात एकीकडे माणूस माणसाला टाळू लागला आहे. तर दुसरीकडे काही लोक माणुसकी जिवंत असल्याची अनुभती देत आहेत. असाच काहीसा प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोतून निदर्शनास येत आहे.

व्हायरल होणारा हा फोटो उत्तर प्रदेशातील असून पॅरालंपियन रिंकू हूडानं हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या फोटोत पोलिस कर्मचारी वृद्ध आणि बेघर महिलेला खायला घालत असल्याचं दिसत आहे.

ट्विटरवर फोटो शेअर करताना रिंकू हूडानं लिहिलं की, “पोलिसांचा असा देखील चेहरा आहे. #Salute” रिंकू हूडाच्या ट्विटला आतापर्यंत जवळपास 500 रीट्वीट आणि 6 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

दरम्यान, या फोटोनं सर्वांचंच मन जिंकलं आहे. अनेकजण या फोटोला पाहून भावूकही झालेले पहायला मिळाले. कोरोना काळात अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकट काळात अनेक लोक मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनानं पतीचं निधन; आर्थिक संकटात असणाऱ्या तरुणीला मित्र-मैत्रिणींनी केली मोलाची मदत

नागपूरात आज आढळले फक्त 203 नवे रूग्ण; कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस होतेय लक्षणीय घट

‘ही’ एक गोष्ट कोरोना संक्रमणामध्ये मृत्यूचा धोका कमी करते, NIMSचा मोठा दावा

बाप की हैवान? पत्नीने जेवण न वाढल्याच्या रागात 9 महिन्याच्या चिमुकलीची हत्या

लग्नात स्टेजवर जाण्याआधीच नवरीनं केला हवेत गोळीबार, पाहा व्हायरल व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More