बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एका रात्रीत शेकडो कोरोना रुग्णांचं स्थलांतर, कारण…

मुंबई | संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणाही अपुरी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबई येथील दहिसर, वांद्रे कुर्ला संकुल आणि मुलुंड येथील कोरोना सेंटरमध्ये दाखल असलेल्या शेकडो कोरोनाबाधितांचे स्थलांतर करण्यात येत आहे.

तब्बल 580 कोरोनाबाधित रुग्ण मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये स्थलांतर करण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी बैठक घेऊन रुग्णांच्या स्थलांतरावर चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं. तौक्ते चक्रीवादळाचा धोका मुंबईला बसू शकतो, कारण ताशी 60 ते 80 किलोमीटर वेगाने हे वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

या चक्रीवादळामुळे सर्वच ठिकाणी खबरदारी घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. तसेच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून कोरोना रुग्णांचे स्थलांतर सुरक्षित ठिकाणी करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आली आहे.

दरम्यान, सुसज्ज रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलेंडर आणि गरज भासल्यास इतर यंत्रणा तसेस इंजेक्शनसहित रुग्णांना सुरक्षित स्थलांतरित करा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. रुग्णांचे स्थलांतर महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांमध्ये झाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांना त्याच्याबद्दल माहिती देण्यात येईल, असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

थोडक्यात बातम्या –

एकेकाळी सर्वाधिक रूग्णसंख्या असलेल्या ‘या’ शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

आजीबाईंचा नादच खुळा! वयाच्या 75 व्या वर्षी केला झिंगाट डान्स, व्हिडीओ तुफान व्हायरल

नागीन डान्स करत कोरोना बरा करणाऱ्या भोंदू बाबाचा फिल्मी स्टाईल पर्दाफाश

युपीएससीची परीक्षा क्रॅक करणाऱ्या प्रांजलला कोरोनाने हिरावलं, उपचारादरम्यान मृत्यु

कोरोनाने निधन झालेल्या मोठ्या भावाला मिठी मारून रडला, सकाळी दोघांवर झाले अंत्यसंस्कार

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More