बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बसच्या छतावर शेकडो लोक, ड्रायव्हरने लावला ब्रेक अन्…, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर सतत कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत आसतो. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका बसच्या छतावर मोठ्या प्रमाणात लोक बसलेले पाहायला मिळत आहेत. मजेशीर बाब म्हणजे चालत्या बसचा ब्रेक लागताच जे झालं ते पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.

आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देत त्यांनी सावध राहा, बसच्या छतावर बसून प्रवास करु नका, असं लिहिलं आहे. या व्हिडीओमध्ये आपण एका बसच्या छतावर शेकडो लोक बसलेले आहेत हे पाहतो. ही बस धावत असताना बसच्या समोर एक दुचाकी येते.

दुचाकी समोर आल्याने बसच्या ड्रायव्हरने अचानक ब्रेक लावला आणि छतावरचे लोक पावसासारखे खाली पडल्याचं दिसत आहे. एवढंच नाही तर समोर आलेल्या मोटरसायकलवर असलेले दोन जण देखील पडतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक जण हा व्हिडीओ पाहून खळखळून हसत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ अनेकांनी रिट्विट केला आहे. तर कमेंट्समध्ये या व्हिडीओला काही राजकरणी उपमा देखील दिल्या आहेत. या व्हिडीओवर प्रचंड प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन!

PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; लवकरच खात्यात पैसे येणार

भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकन फलंदाज फेल; टी-20 सामन्यात भारताचा दमदार विजय

“आता प्रिय दिल्लीश्वरांनी आपल्या दिलदारीचं प्रदर्शन करावं”

भविष्यात कोरोनाचे आणखी व्हेरिएंट येण्याची शक्यता, त्यामुळे…- डॉ. रणदीप गुलेरिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More