बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चक्रीवादळाचा ‘या’ तीन राज्यांना बसणार फटका, अलर्ट जारी

मुंबई | नागरिक मोठ्या प्रमाणात उष्णतेमुळं  त्रस्त झाले असताना हवामान विभागानं एक इशारा दिला आहे. राज्यात लवकरच चक्रीवादळ धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.

बंगालच्या उपसागराच्या अग्नेय भागात तयार झालेलं असानी चक्रीवादळ आता भयानक रूप घेण्याची शक्यता आहे. असानी चक्रीवादळाच्या तडाख्यात जवळपास 3-4 राज्य येण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.

उत्तर आंध्र-ओडिशा किनारपट्टीवरून पश्चिम मध्य आणि लगतच्या पश्चिम-उत्तर बंगालच्या उपसागरात पोहोचल्यानंतर आता उत्तर-पुर्वेकडे वळण्याची शक्यता आहे. असानीमुळं पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि ओडीसा या तीन राज्यांना जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 11 मे रोजी चक्रीवादळ आपला मार्ग बदलत भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या समांतर पुढं सरकणार आहे. 10 आणि 11 मे रोजी आंध्र प्रदेश, ओडीशा, पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या – 

संदीप देशपांडेंच्या अडचणीत वाढ! अटकपूर्व जामीनासाठी न्यायालयात धाव

दहावी-बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर

श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी! महिंदा राजपक्षेंचा राजीनामा

सत्र न्यायलयाचा राणा दांपत्याला दणका; अटींचं उल्लंघन अंगलट येणार?

संजय राऊतांच्या अडचणी वाढणार? किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More