बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Cyclone Alert: पुढील 12 तास महत्त्वाचे, ‘या’ भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता

नवी दिल्ली | आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या काही तासांमध्ये या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर (Cyclone Alert) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या बारा तासांमध्ये चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. अंदमान आणि निकोबार बेटांमधील वाऱ्यांची तीव्रता वाढली आहे.

अंदमान आणि निकोबार परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाचं डिप डिप्रेशन अंदमान निकोबार बेटावरील मायबंदरपासून आग्नेयच्या दिशेने 120 किमी अंतरावर आहे. डिप डिप्रेशन वेगाने म्यानमार आणि बांग्लादेशाच्या दिशेने पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ 22 मार्च रोजी म्यानमार आणि बांग्लादेशाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.

हिंदी महासागराच्या क्षेत्रात मार्च महिन्यात चक्रीवादळ तयार होणे हे दुर्मिळ घटना आहे. याअगोदर 1891 ते 2020 या 130 वर्षांच्या काळात फक्त 8 वेळा चक्रीवादळाची नोंद झालेली आहे. यावेळी अंदमान आणि निकोबार बेटांतील परिसरात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सतर्कतेचं पाऊल म्हणून परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात असनी चक्रीवादळाचा फारसा परिणाम जाणवणार नाही. असनी चक्रीवादळाच्या तीव्रतेची शक्यता पाहता अंतर बेट जहाज सेवा आणि चैन्नई आणि विशाखापट्टणम या भागातील जहाज सेवा बंद करण्यात आली आहे. येथील मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच पुढील 12 तासांमध्ये असनी चक्रीवादळ अतितीव्र होण्याची शक्तता वर्तवण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या- 

Sharmila Thackeray: शर्मिला ठाकरेंची शिवसेनेवर घणाघाती टीका, म्हणाल्या…

सर्वसामान्यांना मोठा झटका, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ ?

“… तर भाजपवाले कधीपासून हिंदु झाले पाहावं लागेल”

शेकडो नागरिकांनी आश्रय घेतलेली ‘ती’ इमारत रशियाकडून उद्ध्वस्त

“आम्ही म्हणायचं ठाकरे सरकार पण प्रत्यक्षात लाभ घेतं पवार सरकार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More