नवी दिल्ली | आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. येत्या तीन चार दिवसांमध्ये चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. बंगालच्या उपसागरातील गुरूवारी कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. येत्या 21 मार्चपर्यंत याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
समुद्राकडून उत्तरेकडे जाताना सदर क्षेत्राचा प्रवास अंदमान आणि निकोबार बेटांच्या जवळून होणार आहे. त्यामुळे या बेटांना जोरदार वारे आणि पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. 22 मार्चला हे चक्रीवादळ म्यानमार बांगालादेशाच्या किनारपट्टीजवळ धडकणार आहे. सध्या समुद्राची स्थिती मध्यम आणि उग्र स्वरूपाची आहे. येत्या काही तासांनंतर अत्यंत उग्र होण्याची शक्यता आहे.
असनी हे चक्रीवादळाला देण्यात आलेल नाव आहे. हे चक्रीवादळ 65 ते 75 किलोमीटर प्रतितास वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्र किनारपट्टीला हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने एनडीआरएफसह तिन्ही दलांना अलर्ट जारी केलं आहे. अशाप्रकारचं चक्रीवादळ हे अनेक वर्षांनी तयार होत आहे.
दरम्यान, राज्यात तापमानाचा कडाका देखील वाढला आहे. राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट पाहायला मिळत आहे. गोवा, कोकण, उत्तर महाराष्ट्राला तापमानाची झळ सोसावी लागणार आहे. हवामान जर कोरडे राहिले तर पुढील काही दिवसांत कोणताही बदल होणार नाही. राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पार गेलेला आहे.
थोडक्यात बातम्या-
“नरेंद्र मोदी फक्त 2 तास झोपतात, आता झोपच लागू नये म्हणून…”
“घाबरू नका, नरेंद्र मोदींनंतर भाजप टिकू शकणार नाही”
“मुख्यमंत्र्यांच्या पायाला भोवरा असावा, तोंडात साखर असावी अन्…”
भारतात चौथी लाट येणार?, इस्त्रायलच्या नव्या व्हेरियंटने जगाचं टेन्शन वाढलं
“नारायण राणे आणि नितेश राणेंचा राजकीय इन्शुरन्स संपलाय, आता…”
Comments are closed.