बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अमेरिकेला ‘इडा’ चक्रीवादळाचा मोठा फटका; पाहा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ

नवी दिल्ली | 2005 मध्ये आलेल्या ‘कतरिना’ चक्रीवादळाने अमेरिकेला मोठा तडाखा दिला होता. या चक्रीवादळामध्ये 1800 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता अमेरिकामध्ये पुन्हा एकदा चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. या चक्रीवादळाचे नाव ‘इडा’ असं आहे. या वादळाने पुन्हा एकदा अमेरिकाचं चित्र बदललं आहे.

गुरुवारी आलेल्या इडा चक्रीवादळामुळे अमेरिकामधील न्यूयाॅर्क शहरात विक्रमी पाऊस पडला. रस्ते अचानक नदी बनले आणि सर्वत्र पाणी भरलं. पाऊस असल्यानं अनेक लोक तळघरात होते. त्यामुळे त्यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला. या वादळामुळे आतापर्यंत एकूण 44 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

ईशान्य अमेरिकेला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे तेथील उड्डाणे देखील रद्द करण्यात आली आहेत. लागार्डिया आणि जेएफके तसेच नेवार्क विमानतळावरील शेकडो उड्डाण रद्द करण्यात आली आहेत. या वादळाचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिका पावसाच्या आणि चक्रीवादळाच्या विळख्यात सापडलेल पहायला मिळतंय.

दरम्यान, चक्रीवादळांना गेल्या अनेक वर्षांपासून नावं देण्यात येतात. समुद्रात वादळ निर्माण झालं की हवामान खात्याकडून त्याला नाव दिलं जातं. ताशी 65 किमीपेक्षा अधिक वेगाच्या चक्रीवादळांना ही नावं दिली जातात. पाश्चिमात्य देशांकडून नाव देण्यास सुरुवात झाली होती. अमेरिकेकडून चक्रीवादळांना महिलांची नावं देण्यात येतात.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

‘पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका’; अजित पवारांचा थेट इशारा

Good Morning अण्णा! व्यंगचित्राच्या माध्यमातून राष्ट्रवादीचा अण्णा हजारेंना चिमटा

उद्यापासून राज्यात सलग तीन दिवस जोरदार पाऊस, ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

“भाजपचे कार्यकर्ते नुसते थुंकले तरी सरकार वाहून जाईल”

शिक्षक भरतीवर ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; मुलाखतीद्वारे

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More