बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खुशखबर! सोन्याचे दर सर्वोच्च स्तरापेक्षा तब्बल दहा हजार रुपयांनी उतरले

नवी दिल्ली | सोनं हा भारतीयांसाठी जीव की प्राण समजला जातो. सोन्याचे दागिने घालून मिरवणं एवढंच नव्हे तर गुंतवणूक म्हणून सोनं खरेदी करण्याकडे भारतीयांचा मोठा कल आहे. त्यामुळे जगभरातील मार्केटपैकी भारत हे एक सोन्यासाठी सर्वात मोठं मार्केट मानलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथली लोकसंख्या आणि या लोकसंख्येला असलेली सोन्याची चाहत या गोष्टीमुळे भारतात सोन्याचा बाजार नेहमीच गरम असतो.

भारतात गेल्यावर्षी सोन्याची किंमत सर्वोच्च स्तरावर पोहोचली होती. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर  57 हजार 8 रुपये प्रती तोळा होते. आज सराफा बाजारात सोन्याचा दर सर्वोच्च स्तरापेक्षा 10 हजार 152 रुपयांनी स्वस्त आहे. आज सराफा बाजारात सोन्याचा दर 46 हजार 766 रुपये प्रती तोळा आहे.

तसेच चांदीच्या किंमतीत देखील गेल्या काही दिवसांपासून चढउतार पाहायला मिळत आहे. आज सराफा बाजारात प्रती किलो चांदीचा दर 490 रुपयांच्या वाढीसह 67 हजार 988 रुपये झाले आहेत.

दरम्यान, मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही सोन्याच्या दरावर प्रभाव टाकत असल्याचं दिसून येतं. बहुतांश वेळा इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडूनच मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातो. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.

थोडक्यात बातम्या –

पुण्यातील कोरोना आला आटोक्यात; पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा! पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेश परीक्षांची तारीख जाहीर

मी एक अमेरिकन नागरिक असलो तरी माझ्या मनात भारतच- सुंदर पिचाई

राजकीय नाटकं चालतात पण आमची रंगभूमीवरची नाही- केदार शिंदे

“मंत्रिमंडळात आपल्याला संधी मिळेल अशा काहींच्या अपेक्षा होत्या पण…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More