बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भांडत भांडत बालकनीपर्यंत आले नवरा-बायको अन्…; थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

मॉस्को | नवरा-बायकोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडणं ही होत असतात. सोशल मीडियावर पती-पत्नीचे अनेक भांडणाचे व्हिडीओ या पूर्वी व्हायरल झाले आहेत. त्यातील काही मजेशीर होते. तर काही खूपच धक्कादायक. अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

पती-पत्नी झटापटीच्या नादात बालकनीतून खाली पडले आहेत. हा प्रकार रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे घडला असल्याचं समजत आहे.  इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या ‘ओल्गा वोल्कोवा’ नावाच्या व्यक्तीचं आपल्या पत्नीशी कोणत्या तरी कारणावरून भांडण झालं होतं. त्या दोघांमधील भांडण इतक्या टोकाला गेलं की त्यांनी एकमेकांना मारायला सुरूवात केली.

त्यांच्या या हाणामारीत ते दोघे त्यांच्या घरातील बालकनीपर्यंत पोहोचले, तरी त्यांना त्याचं भान नव्हतं. एकमेकांना मारायच्या नादात त्या झटापटीमध्ये ते दोघे 25 फुट उंच बालकनीतून खाली कोसळले. ही घटना रस्त्यावरील कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून, तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये ते दोघं पती-पत्नी एकमेकांना मारत असल्याचं दिसून येत आहे. तसेच त्या दोघांना आपण बालकनीत आलो असल्याचंही भान नसल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्या हाणामारीमध्ये दोघांपैकी एकाचा संपूर्ण शरिराचा भार बालकनीच्या ग्रिलवर पडला आणि ते ग्रिल तुटल्यामुळे ते दोघे खाली पडले. त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी त्या दोघांना रूग्णालयात दाखल केलं.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

91 वर्षीय मिल्खा सिंग यांची कोरोनावर यशस्वी मात; रूग्णालयातून डिस्चार्ज

“मराठा आरक्षण असो किंवा ओबीसी आरक्षण; आरक्षणाबाबत भाजपचा दुतोंडी चेहरा”

धक्कादायक! मुलाचा बाप कोण हे शोधण्यासाठी दफन केलेल्या बाळाचा मृतदेह काढला बाहेर

भंडाऱ्याची उधळण करत भाजप आमदार महेश लांडगेंचा डान्स, पाहा व्हिडीओ

दिल तो बच्चा है जी! कॅरम खेळता-खेळता दोन म्हताऱ्यांमध्ये तूफान हाणामारी, पाहा व्हायरल व्हिडीओ

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More