नवी दिल्ली | आपल्या पैशांची योग्य गुंतवणूक करण्यावर सर्वांचा भर असतो. आपल्या कमावलेल्या पैशांतील काही रक्कम चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. परिणामी गुंतवणूक करण्याचे मार्ग शोधून चांगला परतावा मिळणाऱ्या ठिकाणी गुंतवणूक केली जाते.
पती-पत्नी साठी कुटुंब कल्याण साधण्यासाठी गुंतवणूक महत्वाची असते. आज गुंतवलेला पैसा उद्या कामाला येणार असतो. म्हणून योजनांमध्ये गुंतवणूक केली जाते. अशा काही सरकारी योजना आहेत ज्यामध्ये गुंतवणुकीचा गुंतवणूकदाराला प्रचंड फायदा होतो. अटल पेन्शन योजना सुद्धा अशीच चांगला परतावा देणारी योजना आहे. या योजनेत दरमहा 10000 पेन्शन मिळु शकते.
अटल पेंन्शन योजनेत वेगवेगळे खाते उघडावे लागेल. या स्वतंत्र खात्याच्या माध्यमातून पती-पत्नी यांना लाभ मिळणार आहे. या योजनेत 18 ते 40 वर्ष वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. या योजनेत 60 वर्षानंतर पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. अटल पेन्शन योजना ही सरकारी योजना आहे, म्हणून या योजनेची सुरक्षितता चांगली आहे.
दरम्यान, अटल पेन्शन योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना चांगल्या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे. एका व्यक्तीने 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजना सुरू केल्यास, त्याला 60 वर्षानंतर दर महिन्याला 5000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. यासाठी दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील. या योजनेत विविध प्रकारे आपण गुंतवणूक करू शकता.
थोडक्यात बातम्या
चीनमध्ये डेल्टाचा धुमाकूळ; देशात पुन्हा दहशतीचं वातावरण
मोठी बातमी! एअर इंडियाला खरेदी करण्यासाठी ‘या’ कंपनीने लावली बोली
टाइम मॅगझिनच्या 100 ‘सर्वात प्रभावशाली लोकांच्या’ यादीत मोदींसह या व्यक्तींचा समावेश
पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर
चिंताजनक! राज्यातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा आकडेवारी
Comments are closed.